Sangli News : सोसायटी निवडणुकीतला पराभव जिव्हारी! ढाबाच पेटवला
Sangli News : सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर एका गटाने चक्क ढाबाच पेटवून दिला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे.

Sangli News : एखाद्या निवडणुकीत पराभव झाल्यास उमेदवाराकडून अथवा त्याच्या गटाकडून कधीकधी राग व्यक्त केला जातो. एका गटाने पराभवाच्या रागातून चक्क ढाबाच पेटवला. सांगलीतील जत तालुक्यातील मुचंडी गावामध्ये ही घटना घडली आहे.
जत तालुक्यातील मुचंडी सोसायटीची शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. यातील पराभवाचा राग मनात धरून विरोधी गटातील ढाबाच काही जणांनी पेटवला. या आगीत 11 लाखांचे नुकसान झाले असून याबाबत जत पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांनी नव्यानेच ढाबा बांधला होता. सोमवारी 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या ढाब्याला आग लावण्यात आली. या घटनेत कोळी यांचे 11 लाखांचे नुकसान झाले. याबाबत जत पोलीस ठाण्यात श्रीधर कोळी यांनी सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे. यामध्ये पोलिसांनी महांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रविणकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील, अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कोळी यांना मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
मुचंडी सोसायटीची शनिवारी निवडणूक झाली. काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सायंकाळी कोळी हे बस स्थानकाजवळ उभे होते. त्यावेळी संशयित आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. रात्री 8 वाजता घरी येऊन आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कोळी यांच्या मालकीचा ढाबा पेटवून दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Nanded : क्लास चालक शिक्षकाकडून 12 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, नांदेडमधील घटनेने खळबळ
- Ulhasnagar Crime News : जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या, पत्नीच्या खुनात झाली होती शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
























