(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trainee Doctor Crime Case : मोबाईलमध्ये तसले व्हिडीओ पाहून नराधमानं महिला डॉक्टरला अक्षरशः ओरबाडलं; ब्ल्यूटूथमुळे भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Trainee Doctor Crime Case : दिल्लीतील प्रमुख सरकारी रुग्णालयांनी सर्व वैकल्पिक सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सरकारी रुग्णालयांनी ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड ड्युटी बंद करण्याचं जाहीर केलं आहे.
Kolkata Trainee Doctor Crime Case : नवी दिल्ली : कोलकात्यात (Kolkata Crime) ट्रेनी डॉक्टरच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. एका नराधमानं ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन तिला जीवे मारलं. या घटनेनं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. फेडरेशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स असोसिएशननं यासंदर्भात घोषणा केली.
दिल्लीतील (Delhi News) प्रमुख सरकारी रुग्णालयांनी सर्व वैकल्पिक सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सरकारी रुग्णालयांनी ओपीडी, ऑपरेशन थिएटर आणि वॉर्ड ड्युटी बंद करण्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, महिला डॉक्टरच्या हत्येतील आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोलकाता येथे एका डॉक्टरवर निर्घृणपणे बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी संजय रॉयला तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिला अत्यंत क्रूरपणे ठार करणाऱ्या आरोपीनं घटनेपूर्वी मद्यपान केलं होतं. तसेच, गुन्हा घडला त्यादिवशी रात्री अकराच्या सुमारास तो दवाखान्याच्या मागे असलेल्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला होता. जिथे त्यानं दारू पिऊन अश्लील व्हिडीओ पाहिला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी नेहमीच असं करत असे. त्याला अश्लील व्हिडीओ पाहण्याची सवय होती. तसेच, तो अनेकदा मद्यधुंद अवस्थेत असायचा.
ब्ल्यूटूथ हेडफोनमुळे आरोपी गजाआड
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक ब्ल्यूटूथ हेडफोन सापडला. त्यानंतर या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. त्यावेळी आरोपीही चौकशीसाठी आला होता. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी सापडलेली ब्ल्यूटूथ आरोपीच्या फोनशी कनेक्ट झाली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आणि तपासला, त्यावेळी त्याच्या फोनमध्ये अनेक हिंसक अश्लील व्हिडीओ होतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉय हा विकृत होता. आरोपीच्या मोबाईलमध्ये ज्या प्रकारचा अश्लील/घृणास्पद मजकूर आढळला, तो सामान्यत) इतर लोकांच्या मोबाईलमध्ये दिसत नाही.
शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी समोर
महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचं समोर आलं आहे. तसेच, तिच्या पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला आणि ओठांना जखमा होत्या. पीडितेवर हल्ला झालेल्या चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये दोन एन्ट्री पॉईंट्स होते. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्या दिवशी रात्री त्याचं एक प्रवेशद्वार बंद करून मागील दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :