स्वतःच पोस्ट केली, शोकसंदेश लिहिला अन् आयुष्य संपवलं; प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं टोकाचं पाऊल उचलंलं
Instagram Influencer Ajmal Shareef: अजमलचे इन्स्टाग्रामवर 15 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अजमलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करून स्वतःसाठी शोकसंदेश लिहिला होता. तो डिप्रेशनमध्ये होता, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
Instagram Influencer Ajmal Shareef: एका धक्कादायक घटनेनं केरळ (Kerala) पुरतं हादरून गेलं आहे. 28 वर्षांच्या प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरनं (Instagram Influencer) आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी अजमलनं इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट टाकून स्वतःसाठीच शोकसंदेश लिहिला. एवढंच नाहीतर त्यानं पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आणि त्यानंतर आत्महत्या करत स्वतःला संपवलं.
पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल शरीफ (Ajmal Shareef) असं मृत 28 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरचं नाव आहे. अजमल केरळमधील अलुवा येथील रहिवासी होता. शुक्रवारी संध्याकाळी साधारणतः साडेसहाच्या सुमारास अजमलचा मृतदेह त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. चांगली नोकरी मिळत नसल्यानं अजमल नैराश्यात होता, असं पोलीस चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अजमलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. इंस्टाग्रामवर अजमलचे 15 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अजमलनं इन्स्टाग्रामवर स्वत:साठी शोकसंदेश पोस्ट केला होता. अजमल शरीफ यांचं निधन झालं असून ही दुःखद बातमी कळवताना अतिशय दुःख होत आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यावर कॅप्शन लिहिलं आहे, 'RIP अजमल शरीफ 1995-2003.' याबाबतची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
View this post on Instagram
अजमल शरीफची पोस्ट पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. स्वत:साठी शोकसंदेश लिहून एखादी व्यक्ती अशी आत्महत्या कशी करू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.
या पोस्टवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं आहे की, "जे लोक त्यांच्यावर टीका करत आहेत किंवा त्यांची खिल्ली उडवत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावं की, त्याला खूप त्रास झाला असेल आणि त्याचं मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं. शेवटी आपण सर्वच माणूस आहोत." आणखी एका युजरनं म्हटलं आहे की, "सोशल मीडियावर आपल्या मृत्यूची बातमी पोस्ट केल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या केली तर त्याला त्रास होणार नाही. RIP ब्रो."