Indapur Crime : पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून पत्नीवर कोयत्याने वार, मदतीसाठी गेलेल्या सासू- सासऱ्यांवरही वार
Crime in Indapur : पत्नीला शिवीगाळ करत तु माझ्या सोबत नांदायला का येत नाही? असा सवाल विचारत "तुला आता जिवंत ठेवत नाही", असे म्हणतं हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने पतीने पत्नीवर हल्ला केल्याची घटना इंदापूर येथे घडली आहे.

बारामती : माणूस किती क्रूर बनू शकतो याचा प्रत्यय इंदापूर (Indapur) येथे आला आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने ऊस तोडण्याच्या कोयत्याने पत्नीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. पत्नीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे घडली आहे. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या सासरवाडीच्या मंडळींवर जावयाने हल्ला केला आहे. या संदर्भात मेहुणा शुभम शिवाजी शेलार यांने इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून इंदापूर पोलीसांनी जनार्धन गोविंद गाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जनार्धन गाडे हा काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या पळसदेव येथील घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करत तु माझ्या सोबत नांदायला का येत नाही? असा सवाल विचारला. "तुला आता जिवंत ठेवत नाही", असे म्हणतं हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर आणि उजव्या हाताच्या मनगटावर वार केला आहे. त्यामुळे आरोपीची पत्नी ही घरात कोसळली गेली. फिर्यादीने जनार्दन गाडे यांच्या हातातून कोयता घेण्याचा प्रयत्न केला असता गाडे याने फिर्यादीच्या डाव्या हाताचे पंजावर बोटावर तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर वार करुन फिर्यादीला जखमी केले. मुलगा रक्तबंबाळ झाल्याचे बघून वडिल मुलाला सोडविण्यासाठी गेले असता जनार्धन गाडे याने वडिलांच्या डाव्या हाताच्या तळव्यावर व उजवे हाताच्या मनगट व बोटांच्यामध्ये वार करून त्यांनाही जखमी केले. त्यांना लाथांनी मारहाण केली. दरम्यान फिर्यादीची आई पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही पाठीत कोयता उलटा मारुन त्यांना ही दुखापत केली. लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर जनार्धन निघून गेला.
जनार्दन गाडे याने जाताना सासरच्या सर्वांना तुम्ही सर्वजण आता माझ्या तावडीतून वाचला आहे. परंतु पुढे माझ्या तावडीतून वाचणार नाही अशी धमकी देऊन तो पळून गेला. त्यानंतर जनार्दन गाडे याविरूद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनार्धन गाडे हा पुणे जिल्ह्यातील नाव्हरे गुनाट विहीर इथला रहिवासी आहे. इंदापूर पोलिसांनी कलम 307, 452, 324, 323,504,506 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Pune-Indapur News: सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत संपवलं आयुष्य; इंदापूरातील धक्कादायक घटना
Pune-Indapur Crime: विकृतीचा कळस! मक्याच्या शेतात नेलं अन् तीन जणांनी केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; इंदापूरमधील घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
