Hingoli Crime News: धक्कादायक! अनैतिक संबंधातील वाद विकोपाला; दिव्यांग इसमालाच संपवले
Hingoli Crime News : अनैतिक संबंधातील वादातून एका दिव्यांग इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील केळी या गावात ही घटना घडली आहे.
Hingoli Crime News हिंगोली : अनैतिक संबंधातील वादातून एका दिव्यांग इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या (murder) केल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली (Crime News) जिल्ह्यातील केळी या गावात ही घटना घडली आहे. केळी गावातील रहिवासी असलेल्या व्यंकटी सांगळे या 35 वर्षीय दिव्यांग इसमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी (Hingoli Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला असता अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासात समोर आले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्यात दगड घालून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी हनुमान सांगळे याचे मृत व्यंकटी सांगळे यांच्या पत्नीसोबत ओळख होती. दरम्यान त्यांच्यात आधिक जवळीक होत असल्याचा संशय मृत व्यंकटी सांगळे याला आला होता. या संशयावरून त्यांच्यात कायम वाद होता. काही दिवसापूर्वी व्यंकटी सांगळे आणि त्याच्या पत्नीमध्ये मोठा वाद झाला. परिणामी या वादाच्या कारणातून व्यंकटी सांगळे यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेत आत्महत्या केली होती.
या कारणावरून नेहमीच संशयित आरोपी हनुमान सांगळे आणि मृत व्यंकटी सांगळे यांच्यामध्ये वाद होत राहिला आणि हाच राग मनात धरून एकदिवस त्याचा बदला घ्यावा असा विचार हनुमान सांगळे याने केला. या विचारात असताना पुन्हा या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादातून राग विकोपाला गेला आणि हनुमान सांगळे याने व्यंकटी सांगळेला जोरदार मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावर मोठा दगड मारला.
परिसरात एकच खळबळ
त्यानंतर व्यंकटी अल्पावधीतच रक्तबंबाळ होऊन खाली पडले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी हनुमान सांगळे हे पाहून भयभीत झाला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या थरारक घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आसता त्यातून हनुमान सांगळे याने ही हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी हनुमान सांगळे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. मात्र शहरात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या