एक्स्प्लोर

Kalyan : दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप

या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित शासकीय विभागाकडूनही अनुदानाशी संबंधित कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

ठाणे : कल्याणजवळील भिवंडी तालुक्यातील नांदकर गावातील शिक्षण संस्थेवर कोट्यवधी रुपयांच्या शासकीय अनुदान घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळा उभारण्यासाठी केवळ दोन एकर जमिनीचा करार असताना कागदपत्रांमध्ये साडेसात एकर जमीन दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या सचिवाविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसह संबंधित शासकीय विभागाकडूनही चौकशी सुरू आहे.

Education Grant Scam : अनुदान मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील नांदकर गावातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाने शाळा उभारण्यासाठी सुरुवातीला जमीन मालक आणि सहमालकांसोबत साडेसात एकर जमिनीचा करार केला होता. मात्र अवघ्या आठवड्याभरात संस्थेच्या मागणीनुसार हा करार रद्द करून फक्त दोन एकर जमिनीचा नवीन करार करण्यात आला. त्यानंतर या जागेवर डी.बी. स्कूल आणि वसतीगृह उभारण्यात आले.

RTI Revelation : माहितीच्या अधिकारातून धक्कादायक खुलासा

2019 पासून शाळा सुरू असून काही वर्षांनंतर जमीन सहमालकांनी संस्थेकडे शाळेचा आर्थिक हिशोब मागितला. मात्र संस्थेकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याने सहमालकांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) कागदपत्रांची मागणी केली.

या कागदपत्रांमधून धक्कादायक बाब समोर आली. प्रत्यक्षात संस्थेकडे फक्त दोन एकर जमिनीचा वैध करार असताना शासकीय कागदपत्रांमध्ये साडेसात एकर जमीन असल्याचे दाखवण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.

Fraud Allegation: शासनाची कोट्यवधींची फसवणूक?

तक्रारदाराच्या वकिलांनी आरोप केला की, या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेने शासनाकडून शाळेसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवले. या प्रकरणी जमीन सहमालकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर पडघा पोलीस ठाण्यात संस्थेच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Investigation: पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित शासकीय विभागाकडूनही अनुदानाशी संबंधित कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोप सिद्ध झाल्यास शिक्षण क्षेत्रातील अनुदान प्रक्रियेमधील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget