एक्स्प्लोर

Stuti Sonawane Suicide : फुजैल... मी तुझ्या सगळ्या वाईट सवयी सहन केल्या, पण तू मला अपमानित केलंस; डॉ. स्तुती सोनवणेच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय? 

Mumbai Stuti Sonawane Suicide : एका डेटिंग अॅपवरुन ओळख झाल्यानंतर फुजैल खान आणि स्तुती सोनवणे हे रिलेशनशिपमध्ये आले. परंतु फुजैलने आपला मानसिक छळ केल्याचं सांगत स्तुती सोनवणेने आत्महत्येचे पाऊल उचललं.

मुंबई : अँटॉप हिल परिसरातील डॉ. स्तुती सोनवणे आत्महत्येच्या प्रकरणात सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली. प्रियकराच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मानसिक ताण वाढल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं स्तुतीने म्हटलं आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या स्तुतीने तिचा प्रियकर फुजैल खान याचा उल्लेख करत त्यांच्या नात्यातील अनेक प्रसंग आणि शेवटच्या काळात झालेल्या वादांचा उल्लेख केला आहे.

मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील डॉ. स्तुती सोनवणे यांच्या आत्महत्या प्रकरणी फुजैल मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. स्तुती सोनवणे आणि फुजैल खान गेल्या वर्षभरापासून रिलेशनशीपमध्ये होते. एका डेटिंग साईटवरून दोघांची ओळख झाली होती. मात्र फुजैल वारंवार छळ करत होता असं डॉ. स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये आढळलं आहे. तू एक दिवस फ्रीजमध्ये सापडशील असं तिच्या मैत्रिणी चिडवायच्या. 8 मार्च रोजी डॉ. स्तुती हिने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

Stuti Sonawane Suicide Note : काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये?

प्रिय फुजैल,

आपली पहिली भेट दादरला झाली होती ते मला अजूनही आठवतंय. आपण तासन्‌तास चाललो होतो आणि पिझ्झा खाताना तू मोठ्याने ओरडत हसत होतास. त्या क्षणी आपली लगेचच छान मैत्री झाली होती.

माझा वाढदिवस तू ताज हॉटेलमध्ये ज्या प्रकारे साजरा केला, खोली सजवली होतीस, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कोणी मला इतकं खास वागवेल असं मी कधी कल्पनाही केली नव्हती.

आपला अलीबागचा ट्रिप, त्या बाइक राईड्स, आंबट कँडी खात घालवलेले क्षण, त्या छोट्या बाथटबमध्ये तू बसण्याचा प्रयत्न करत होतास ते खूप मजेशीर आणि गोड होतं. बॅडमिंटन खेळताना मी तुला नेहमी हरवायचे, तेही मला आठवतं.

ड्रॅगनफ्लाय हायच्या गल्ल्यांमध्ये आपण फिरायचो, छोट्या कामांसाठी जायचो आणि मांजरींना कुरवाळायचो, ते क्षणही आठवतात. आपण खेळलेला तो गेमही आठवतो, ज्यात आपण दोघांनी एकाच ‘पॉइझन कँडी’ची निवड केली होती. किती योगायोग होता तो!

आपले रविवारचे दिवसही आठवतात. आपण तासन्‌तास झोपायचो, आणि तू माझ्या कानात बाळासारखा घोरायचास. आपण केलेली डान्स रीलही आठवते. आपण खूप मस्ती केली होती.

फक्त आनंदाचे क्षणच नाही, तर कठीण वेळीही तू माझ्यासोबत होतास. मी फॅम्बीमध्ये असताना तू इतक्या दूरून आला होतास, माझ्या स्कूटीच्या किल्ल्या घेतल्या, टोइंगची सर्व कामं केलीस. हे सगळं कोण करतं?

मी ही चिठ्ठी फक्त तूच वाचावी अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की तुला तुझा स्वाभिमान सापडेल. धन्यवाद, मला माझा मार्ग दाखवल्याबद्दल. कदाचित मी याच पात्रतेची होते.

तू मला खूप अपमानित केलंस. मी इतकी वाईट आहे का? तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले. मी पूर्णपणे सुन्न झाले आहे. मला काहीच समजत नाहीये.

मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझा नाजूक पुरुष अहंकार आता समाधानी झाला असेल. मी आयुष्यात कधी इतकी खालच्या पातळीवर वाटले नव्हते. यापेक्षा वाईट काय होऊ शकतं?

सगळं असूनही मला स्वतःवर हसू येतंय, कारण मला अजूनही तुझ्यासोबत राहायचं होतं. तुझे शब्द माझ्या डोक्यात सतत घुमत आहेत. तू माझ्यावर ओरडलास. मला असं वाटलं की मी तुझ्यासमोर असते तर तू मला मारलंच असतंस किंवा खूप हिंसक झाला असतास.

मला तुझी भीती वाटते. तू मला “हो” म्हणालास, तू म्हणालास की माझ्यावर खर्च केलेला वेळ आणि पैसे तुला वाया गेल्यासारखे वाटतात. खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत कधीच सुरक्षित वाटलं नाही, पण तरीही मी तुझ्यावर प्रेम केलं.

तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ते बरोबर होतं – तरुण मुली चांगल्या नसतात. आपण रिलेशनशिपमध्ये असताना तुझ्याकडे बंबल अॅप होतं. तरीही मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभिमानच नव्हता.

आयुष्य खूप कठीण आहे.

मी आणि फुजैल एक वर्षाहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होतो. त्याच्या अनेक वाईट सवयी होत्या – धूम्रपान, दारू पिणे. तरीही मी हे सगळं सहन केलं. कदाचित मी मूर्ख होते. आता तर आणखी मूर्ख आहे. पण मी त्याच्या प्रेमात पडले.

माझ्या आयुष्यात एक संतुलन होतं. मी काम करत होते. सगळं ठीक चाललं होतं. पण रिलेशनशिपमध्ये असतानाही त्याने बंबल इंस्टॉल केलं. तरी मी दुर्लक्ष केलं.

तो इतका वाईट असेल तर मला इतका त्रास का होतोय? कदाचित मी त्याला कधी भेटायलाच नको होतं.

मला काय करावं कळत नाहीये. मला वाक्यही नीट लिहिता येत नाहीत. मला सगळं संपवायचं आहे असं वाटतंय.

माझ्यासोबत असं वागण्याइतकं मी काही चुकीचं केलं होतं असं मला वाटत नाही. त्याने माझी स्कूटी तोडून टाकण्याची धमकी दिली. तो माझ्यावर ओरडला. त्याला वाटतं तोच एक चांगला माणूस आहे, पण ते खरं नाही.

खरं तर तो सर्वात वाईट लोकांपैकी एक आहे.

मी कदाचित मूर्ख आहे. पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. सगळं आपल्या नियंत्रणात नसतं.

मला खूप खूप दुःख होतंय.

ही एकटेपणाची भावना अधिकच वाढत आहे. माझे मित्र खूप चांगले आहेत. माझं कुटुंबही खूप छान आहे. डॉ. बंगा नेहमी माझी विचारपूस करतात.

मी एकटी नाही, पण जरी मी त्यांच्याशी बोलत असले तरी एक क्षण एकटी पडली की मला असं वाटतं की मी जमिनीवर कोसळते आहे.

माझ्या मनात फक्त मृत्यूचाच विचार येतो. मी खूप सुन्न झाले आहे. मला वाटतं आता मला काहीच बरे करू शकत नाही. कदाचित शेवटच मला बरा करू शकेल.

मी खूप थकले आहे. मला अपघातात मरावं असं वाटतंय. कदाचित सोपा मृत्यू मिळेल.

माझ्या मित्रांनी कधी तरी मजेत म्हटलं होतं – “आम्हाला तुझं शरीर फ्रिजमध्ये पाहायला आवडणार नाही.” तेव्हा मला वाटलं होतं सगळे तसे नसतात. पण कदाचित ते बरोबर होते.

मी आता खूप थकले आहे. मला हे सगळं सहन होत नाही. मला आयुष्यात कधीच इतका अपमान सहन करावा लागला नव्हता.

मला हे आयुष्य नको आहे. मला पुन्हा कधी उठायचं नाही. कदाचित मृत्यूनंतरच्या आयुष्यात मला शांती मिळेल.

फुजैलसाठी मी माझा अभिमान, स्वाभिमान सगळं सोडलं. तुला अनेकदा माफ केलं. पण आता हे सहन होत नाही.

आई, बाबा, माझी बहीण आणि डॉ. बंगा... मला माफ करा. मी खूप कमकुवत आहे. मला हे आयुष्य जगता येत नाही.

मी मोठी होऊ शकले नाही, यशस्वी होऊ शकले नाही, पैसे कमवू शकले नाही, याबद्दल मला खूप वाईट वाटतं.

मी प्रयत्न केला, पण हे खूप कठीण आहे. हा विचार मला आधीही अनेकदा आला होता. पण यावेळी तो थांबवता आला नाही.

कृपया मला माफ करा.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget