एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Flights Bomb Threat Case : पुण्यात सहा वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवणार असल्याचं धक्कादायक ट्विट; धमक्यांची मालिका सुरूच!

Pune Flights Bomb Threat Case : देशातील प्रवासी विमानांना बाॅम्बच्या धमक्यांची मालिका सुरूच आहे. दरम्यान, पुण्यात सहा वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवणार असल्याचं धक्कादायक ट्विट समोर आले आहे.

Flights Bomb Threat Case : देशातील प्रवासी विमानांना बाॅम्बच्या धमक्यांची मालिका सुरूच आहे. गेल्या शनिवार 19 ऑक्टोबरला 30 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर पूर्ण तपासणीनंतर विमाने रवाना करण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे तासनतास हाल झाले. हा खळबळजनक प्रकारा ताजा असताना पुण्यातून (Pune News) अशीच एक बातमी समोर आली आहे.

पुण्यात सहा वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवणार (Flights Bomb Threat)असल्याचं धक्कादायक ट्विट समोर आले आहे. विस्तारा एअरलाईन्सच्या 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचं ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये ट्विट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या ट्विटमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

6 वेगवेगळ्या विमानामध्ये 12 जण बॉम्ब ठेवणार?  

मिळालेल्या माहितीनुसार,  स्किझोफेर्निया या ट्विटर अकाऊंटवरून अज्ञात इसमाने हे ट्विट केले होते. यात 6 वेगवेगळ्या विमानामध्ये 12 जण बॉम्ब ठेवणार असल्याची ट्विटमधून माहिती देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरोधात गुन्हा दाखल केला असून ट्विटद्वारे दहशत पसरवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा शोध सध्या सुरु करण्यात आला आहे. यातील आरोपीने 6 विमानांचे नंबरही ट्विटमध्ये टाकले होते आणि बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे ट्विट मध्ये उल्लेख केला आहे.

ट्विट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

सिझोफेनिया 111 (schizophrenia111 @schizophreniqqq) असे ट्विटर अकाऊंट वापरकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सिंगापूर ते पुणे विमान प्रवासादरम्यान ट्विटरद्वारे रविवारी दुपारी दीड वाजता घडला. मेसेजमध्ये 12 जण विमानात असून त्यापैकी 6  जण तुमच्या विमानात बॉम्बसह आहेत. फ्लाईट यु के 24, फ्लाईट यु के 106, फ्लाईट युके 146, फ्लाईट युके 116, फ्लाईट युके 110, फ्लाईट युके 107 (प्रत्येकी 2 जण) सर्व जण संपणार आहेत. असा मेसेज मिळाला आहे. तर एअरपोर्ट परिसरातील नागरिक आणि  प्रवाशांमध्ये खोटी माहिती आणि अफवा पसरवून भितीदायक वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे

प्रवासी विमानांना बाॅम्बच्या धमक्यांची मालिका सुरूच 

एकंदरीत देशातील प्रवासी विमानांना बाॅम्बच्या धमक्यांची मालिका लक्षता घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीलाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवून कोळसा मंत्रालयात सचिव केले. हा बदल धोक्याच्या बाबींशी जोडला जात आहे. त्याच वेळी, एकाच वेळी 30 धमक्या मिळाल्यानंतर, विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी त्यांना आश्वासन दिले की भारतीय आकाश पूर्णपणे सुरक्षित आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Embed widget