घोरपडीचे 781 लिंग अन् इंद्रजालची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; मनमाड रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई
Nashik Crime News : घोरपडीचे लिंग व इंद्रजालची मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून तस्करी करणाऱ्याला माहिती भारत सरकारच्या अखत्यारीतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाने अटक केली.
Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घोरपडीचे (Monitor Lizard) लिंग व इंद्रजालची मनमाड रेल्वे स्थानक (Manmad Railway Station) परिसरातून तस्करी (Smuggling) होणार असल्याची माहिती भारत सरकारच्या अखत्यारीतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाला मिळाली. या पथकाने तस्करी करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
यावेळी एक संशयित आरोपी पसार झाला आहे. तर दुसऱ्याच्या ताब्यातून घोरपडीचे 781 लिंगे व 20 किलो इंद्रजाल जप्त करण्यात आले आहे. आदेश खत्री पवार (Adesh Khatri Pawar) (रा.अस्वलदरा, नांदगाव) असे अटक केलेल्याचे नाव असल्याचे समजते.
सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
घोरपड या वन्यप्राण्याची सुमारे 781 लिंग (हत्था जोडी) तसेच सागरी जीव असलेले इंद्रजाल (सी फॅन, सी कोरल्स) साधारणतः 20 किलो असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी असेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी
संशयित आरोपी आदेश पवार यास नांदगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात रविवारी नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने हजर केले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत पवार यास दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
यांनी बजावली कामगिरी
निखिल सावंत यांच्या पथकाने अस्वलदरा भागात सापळा रचून पवार याच्या मुसक्या आवळल्या. आदेश खत्रीचा साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाला. पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, विभागीय वनाधिकारी (दक्षता) विशाल माळी, प्रभारी सहायक वनसंरक्षक अक्षय म्हेत्रे, नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त घोरपडीचे लिंग व इंद्रजाल खरी असल्याची खात्री करून घेतली. पथकाने आदेश खत्री यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या