एक्स्प्लोर

Digital Arrest Case: "हॅलो, मी CBI ऑफिसर बोलतोय..." वृद्ध महिलेच्या खात्यातले 72 लाख काही सेकंदात लंपास, नेमकं काय घडलं?

Digital Arrest Case: केरळमधील 82 वर्षांची महिला सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. सायबर ठगांनी मोठ्या चतुराईनं एका वृद्ध महिलेला लक्ष्य करुन तिच्या बँक खात्यातून 72 लाख रुपये चोरले.

Digital Arrest Case: सध्याचं युग सोशल मीडियाचं (Social Media) आहे, असं आपण सर्रास ऐकतो. पण, याच सोशल मीडियाच्या जाळ्यात अनेकजण गुरफटले जातात. तर, अनेकांना या जाळ्यात अडकवलं जातं. सायबर ठगांनी (Cyber Fraud) आजवर अनेकांना वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लुटल्याचे प्रकार समोर आलेत. असचं एक प्रकरण केरळमधून (Kerala News) समोर आलं आहे. केरळमधील 82 वर्षांची वयोवृद्ध महिला सायबर ठगीची (Cyber Crime) शिकार झाली आहे. सायबर ठगांनी मोठ्या चतुराईनं महिलेला लुटल्याचं समोर आलं आहे. 

केरळमधील 82 वर्षांची महिला सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. सायबर ठगांनी मोठ्या चतुराईनं एका वृद्ध महिलेला लक्ष्य करुन तिच्या बँक खात्यातून 72 लाख रुपये चोरले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेनं सांगितलं की, 23 ऑगस्टला तिला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. फोन करणाऱ्यानं स्वतःची ओळख आरबीआय ऑफिसर म्हणून सांगितली. यानंतर आरोपीनं महिलेला तिचे क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचं सांगितलं आणि त्याकडे तातडीनं लक्ष देऊन अनब्लॉक करण्याचा सल्ला दिला. 

यानंतर महिलेला दुसरा फोन आला आणि त्यानंतर ठगानं सीबीआय अधिकारी म्हणून महिलेला आपली ओळख सांगितली. बनावट सीबीआय अधिकाऱ्यानं महिलेला सांगितलं की, तिच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इतर अनेक आरोपही करण्यात आल्याचं त्यानं महिलेला सांगितलं. महिला खूपच घाबरली. त्यानंतर त्या भामट्यानं तपास सुरू असेपर्यंत सहकार्य करा, असंही महिलेला बजावलं. त्यापुढे बनावट कागदपत्र दाखवून महिलेला डिजिटल पद्धतीनं अटक करण्यात आली आणि त्यानंतर थेट अटकेची धमकी देण्यात आली.  

महिलेकडून बँक अकाउंटची माहिती घेतली 

भामट्यानं महिलेकडून हळूहळू माहिती घेण्यास सुरुवात केली. महिलेला हा तपासाचाच एक भाग असल्याची बतावणी देखील त्यानं केली. पुढे त्याला सांगण्यात आलं की, जर त्यानं महिलेला तपासात सहकार्य केलं नाही, तर तिला तात्काळ अटक करण्यावाचून पर्याय नसेल, असंदेखील सांगितलं. त्यानंतर घाबरलेल्या महिलेनं आपले सर्व अकाउंट डिटेल्स भामट्याला दिले. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या अकाउंटमधून 72 लाख रुपये उडाले. 

सायबर ठगांपासून सावध राहा 

सायबर फसवणूक टाळण्यासाठी, कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका. याशिवाय तुमच्या फोनवर आलेला ओटीपी अजिबात शेअर करू नका. तसेच, फेक मेसेजवर क्लिक करू नका किंवा कोणतीही महत्त्वाची माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रश्न, अजितदादा म्हणाले, बघू आता...
Madhuri Misal On Mayor Reservation : ठाकरे गटाचा आक्षेप नियमाला धरुन नाही, मिसाळ यांची प्रतिक्रिया
Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Embed widget