एक्स्प्लोर

धाराशिव हादरलं! मजूर महिलेवर पोलिसाकडून अत्याचार, गुन्हा दाखल; पोलीस दलात खळबळ

Dharashiv Crime News : या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पोलिसावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dharashiv Crime News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका ऊसतोड कामगार महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यांनेच बळजबरीने अत्याचार केला आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पोलिसावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना आष्टावाडी शिवारात 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडू सुदान भुरके व खासगी जीप चालक सागर चंद्रकांत माने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीनुसार, ऊसतोड कामगार महिला आणि तिचा दीर भूम बसस्थानकात दुपारच्या सुमारास थांबले होते. त्यांना बार्शीकडे जायचे असल्याने ते बसची वाट पाहत होते. दरम्यान, याचवेळी भूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला दगडू सुदान भुरके तिथे आला. तसेच पिडीत महिलेकडून जाऊन 'कोठून आलात? इथं कशासाठी थांबलात? तुम्ही चोर दिसतायं? असे म्हणू लागला. यावेळी त्याने फोन करून खासगी चालक सागर माने यास जीप घेऊन बोलावून घेतले. बस स्थानकात उभे असलेल्या महिला आणि तिच्या दिराला पोलीस ठाण्यात घेऊन जायचं असल्याचे सांगून गाडीत बसवून बसस्थानकाच्या बाहेर बाजारात नेले. त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यासाठी 10 हजारांची मागणी केली. यावेळी पीडितेने ऊसतोड मुकादम यांना फोन करून सागर मानेच्या मोबाईलवर पैसे पाठवले. पैसे मिळाल्यावर पीडिता व तिच्या दिराला तिथेच सोडून कॉनस्टेबल भुरके तेथून निघून गेला, आणि पुन्हा परत आला. 

ज्वारीच्या पिकात नेऊन बळजबरीने अत्याचार 

कॉनस्टेबल भुरके याने सोडल्यावर महिला आणि तिचा दीर पुन्हा वस स्थानकावर येऊन उभे राहिले. मात्र, कॉन्स्टेबल भुरके दुचाकीवरून पुन्हा तिथे आला आणि 'तुम्ही इथं थांबू नका. तुम्हाला दुसरे पोलिस घेऊन जातील. मी तुम्हाला आष्टावाडी येथे सोडतो', असे म्हणाला. त्यानंतर दोघांना दुचाकीवर बसवून आष्टावाडीला पोहचला. तिथे गाडी थांबवून एक फोन केला आणि फोन ठेवल्यानंतर 'मॅडमला तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले. तसेच, माझ्यासोबत पोलिस स्टेशनला चला', असे म्हणून दिराला तिथेच सोडून पीडितेस दुचाकीवर बसवून तेथून निघून गेला. दुचाकी काही अंतरावर गेली असता, कॉन्स्टेबलने भुरके याने पीडित ऊसतोड कामगार महिलेस ज्वारीच्या पिकात नेऊन बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेस पुन्हा आष्टावाडी येथे सोडून फरार झाला. त्यामुळे महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके व खासगी जीप चालक सागर चंद्रकांत माने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Pune Crime News : शिक्षकाकडून विद्यार्थीनीला 'I Love You' चा मेसेज; स्टाफ रुममध्ये बोलवलं अन्...; पुण्यात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget