Fraud : विधवेशी लग्न करा आणि करोडपती व्हा; सोशल मीडियावर फसवणुकीचा नवा फंडा
Crime News : विधवेशी लग्न करा आणि करोडपती व्हा, असा सोशल मीडियावर फसवणुकीचा नवा फंडा आलाय. या फंड्यातून अनेकांना गंडा घालण्यात आलाय.
Crime News : कधी लॉटरीचे आमिष दाखवून तर कधी नोकरीचे, कधी हनी ट्रॅपमध्ये अडकवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यात आता सोशल मीडियावर फसवणुकीचा नवा फंडा आलाय. विधवेशी लग्न करा आणि करोडपती व्हा, या नव्या फंड्याच्या माध्यमातून काही भामटे अनेकांची फसवणूक करत आहेत. फसवणुकीचे असे अनेक गुन्हे अलीकडे समोर आले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार नित्यनियमाने सुरू असतो. त्यात आत सोशल मीडियावर एक विधवा तरुणी अन् तिच्यासोबत एक महिला किंवा पुरुष तरुण असलेला व्हिडीओ फेसबुकवर हमखास बघावयास मिळत आहे. या विधवा महिलेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा, असे या व्हिडीओमधून ही महिला सांगताना दिसून येते. नेट युजर्स त्याला प्रतिसाद देत आपला मोबाइल नंबर त्या व्हिडीओ कमेंट बॉक्समध्ये शेअर करत जाळ्यात ओढले जात आहेत. असे प्रकार राज्यात सध्या समोर येत आहेत. पोलिस अशा प्रकारापासून सावधान राहण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आवाहन करतात. याबरोबरच ही निव्वळ फसवणूक आहे असं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
फेसबुकवर अशाप्रकारे अनेक व्हिडीओंमध्ये आतापर्यंत अनेकजण बळी पडलेले लोक दिसतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओखाली अनेक लोक त्याला प्रतिसाद देत आपला मोबाइल नंबर त्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करत जाळ्यात ओढले जात आहेत. पोलिसांकडे देखील याविषयी अनेक तक्रारी येत आहेत. तसेच सायबर तज्ज्ञांकडे देखील याविषयी काय करावे याबाबत मार्गदर्शनासाठी लोक विचारत आहेत, अशी माहिती सायबर एक्सपर्ट तन्मय दीक्षित यांनी दिली.
खोटी आमिषे दाखवून सोशल मीडियावर अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते. त्यामध्ये आणखी या एका या फांड्याची भर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे व्हिडीओ तुम्ही देखील पाहात असाल आणि त्याला प्रतिसाद देत असाल तर सावधान राहा, कारण तुमची देखील फसवणूक होऊ शकते, असे आवाहन सायबर तज्ज्ञांसह पोलिसांनी केलंय.
अशी केली जाते फसवणूक
या व्हिडिओमधून विधवा महिलेसोबत लग्न करण्याचे आवाहन केले जाते. त्याबदल्यात तिची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी लग्न करणाराला देण्याचे आमिष दाखवले जाते. व्हिडोओमधील विधवेसोबत लग्न करण्यास जो कोणी उत्सुक आहे. त्याने आपला मोबाइल नंबर कमेंटस् बॉक्समध्ये शेअर करावा, त्याच्यासोबत संपर्क साधला जाईल सांगण्यात येते. कमेंट बॉक्समध्ये नंबर शेअर केल्यानंतर त्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून युजर्सची विचारपूस केली जाते. त्यांतर काही दिवस त्या युजर्सला कोणत्या ना कारणाने संपर्क साधून त्याचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास त्याला धमकविले देखील जाते.
महत्वाच्या बातम्या