एक्स्प्लोर

Chhattisgarh Naxal : मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश; तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

Chhattisgarh Naxal: छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेतून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) नक्षल विरोधी (Anti Naxalite) मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये (Bijapur) सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेतून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी (Naxal) आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे छत्तीसगढमध्ये हा नक्षल चळवळीला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नक्षलचा हिंसक मार्ग सोडून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगण्याचे आवाहन प्रशासन करत असताना सुरक्षा दलाच्या नक्षल विरोधी कारवाईला मोठे यश आले आहे.

विशेष बाब म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्या 9 नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बिजापूरमध्ये (Bijapur Naxal) जानेवारी 2024 पासून आतापर्यंत एकूण 180 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यातील 76 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत अनेक चकमकीत तब्बल शंभरहुन अधिक नक्षल्याचा खात्माही केलाय. 

नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश

फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आता पर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधाळून अनेकांचा खात्मा केलाय. अशातच छत्तीसगडमध्ये तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना आणि नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे मानलं जात आहे. 

 कतरंगट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक  

नुकतेच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही माओवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या माहिती मिळाली होती. मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने या  जंगल परिसरात पाठवण्यात आले.

दरम्यान हे अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुर केला. त्यानंतर पोलीस आणि नक्षल्यामध्ये काही काळ चकमक झाली. या दरम्यान संधी मिळताच पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जावानांनी प्रत्युत्तरादाखल आणि स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

तीन जहाल माओवाद्यांचा खात्मा 

दरम्यान, पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबवली असता, परिसरात तीन जहाल माओवाद्यांचे मृतडेह आढळून आले. मारल्या गेलेल्या या माओवाद्यांमध्ये एक डीव्हीसीएम (Divisional committee member) दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य आणि एक दलम सदस्य यांना ठार करण्यात यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण 22 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. घटनास्थळावरुन पोलिसांना तीन ऑटोमॅटीक शस्त्र आणि इतर साहित्य आढळून आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 01 April 2025Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा :01 April 2025 : 7 AMABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 01 April 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Embed widget