Chhatrapati Sambhajinagar: संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी एका आरोपीला बेड्या; घरात मोठं सोनं अन् कॅश असल्याची दिली होती टीप
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील दरोडा प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी 26 मेच्या मध्यरात्री काही दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. दरम्यान, या दरोडाच्या घटनेत संशयित असलेल्या एका आरोपीचा पुणे शाखेच्या पथकाने एन्काऊंटर केलाय. दरम्यान या घटनेनंतर या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देवीदास नाना शिंदे असं या आरोपीचे नाव असून शिंदे नीच संतोष लड्डा यांच्या घरात मोठं सोनं आणि कॅश असल्याची टीप दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय दरोड्याच्या गुन्ह्यांत वापरलेली कार किया सेलटॅास, होण्डा ॲक्टीव्हाही दोन आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाची टीप देणारा आरोपी देवीदास नाना शिंदे (वय -45) हा वडगाव कोल्हाटी शिवाजी नगर एमआयडीसी वाळूज येथील रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली असून उर्वरित कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यामुळे या चौकशी अंती नेमकी आणखी काय खुलासा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मोठा दरोडा पडला होता. या दरोडाच्या घटनेत संशयित असलेल्या एका आरोपीचा पुणे शाखेच्या पथकाने एन्काऊंटर केलाय. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील अमोल खोतकर या संशयीत आरोपीवर पोलिसांनी गोळी चालवली. दरोडाच्या घटनेत संशयीत आरोपी अमोल खोतकर यांनी गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, संशयीत आरोपी अमोल खोतकर आपल्या गर्लफ्रेंड सह एका हॉटेलमध्ये येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री अकरा वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथे हसबे यांच्या हॉटेल जवळ कार घेऊन आला असता पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली. कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एसपीआय रविकिरण गच्चे यांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला असे सांगण्यात आले. दरोड्यातील मुद्देमालाबाबत अधिकृत कागदपत्रे अजूनही पोलिसांनी आयकर विभागाला कळवलेली नाहीत. पोलिसांनी आयकर विभागाला अजून का सहभागी केले नाही? असं सवाल उपस्थित होतोय.
इतर महत्वाच्या बातम्या



















