Rohit Arya Encounter Powai News: 'A Wednesday' चित्रपटासारखा थरार प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न; रोहित आर्यने 3 महिन्यांपासून आखलेला प्लॅन, धक्कादायक माहिती समोर
Rohit Arya Encounter Powai News: ऑडिशनच्या नावाखाली परभणी, लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या 15 वर्षांखालील 17 मुलांसह 20 जणांना रोहित आर्या (वय 50) नावाच्या व्यक्तीने पवईच्या प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओमध्ये ओलिस ठेवल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.

Rohit Arya Encounter Powai News: मुंबईच्या पवईमध्ये 30 नोव्हेंबर रोजी अपहरणाचा थरार (Powai Kidnapping News) रंगला होता. ऑडिशनच्या नावाखाली परभणी, लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या 15 वर्षांखालील 17 मुलांसह 20 जणांना रोहित आर्या (Rohit Arya Encounter Powai News) नावाच्या व्यक्तीने पवईच्या प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओमध्ये ओलिस ठेवल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी बोलण्यात गुंतवून रोहित आर्याचे एन्काउंटर केले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली. सदर प्रकरणी आता विविध माहिती समोर येत आहे.
पवईतील अपहरण आणि धमकावण्याबाबतचा कट रोहित आर्या (Rohit Arya Encounter) मागील 3 महिन्यांपासून आखत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रोहित आर्याने 'A Wednesday' या चित्रपटातील काल्पनिक कथा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. रोहित आर्यने बाल कलाकारांसाठी ऑनलाईन जाहिराती दिल्या होत्या, पवईतील स्टुडिओही स्वत:च भाड्याने बुक केले होते. जाहिरात पाहून राज्याच्या कानाकोपऱ्यातून 70 मुले ऑडिशनसाठी आली होती. यातील 17 मुलांची निवड त्याने केली. ही निवड करताना मुलांचे तीन ग्रुपही बनवले होते.
रोहित आर्य 4 मुलांना पेटवणार होता- (Rohit Arya Encounter)
घटना प्रत्यक्षात करत असतना सर्वांनाच हे सर्व चित्रपटाचा भाग आहे असे वाटत असल्याने आर्याला तितकाता विरोध झाला नसल्याचे सांगितले जाते. इतकच काय तर पोलिसांना घाबरवण्यासाठी प्रशासनाला वेटीस धरण्यासाठी आर्या त्याच्यासोबत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्या 4 मुलांना पेटवणारही होता. याबाबतचं साहित्यही सोबत होतं. आर्याच्या त्या व्हिडीओत तो एकटा नसून अन्य लोकंही त्याच्यासोबत असल्याचा दावा तो करत होता. आता ही अन्य लोकं कोण याचा पोलिस शोध घेत आहे.
पोलिसांना एन्काऊटर करायची वेळ का आली? (Powai Kidnapping News)
पवई एन्काऊटर प्रकरणी पोलिसांना एन्काऊटर करायची वेळ का आली याचं स्पष्टीकरण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत द्यावं लागणार सूत्रांची माहिती आहे. रोहित आर्या पोलिसांचा संवाद सुरू असताना, आत मध्ये लहान मुले आहेत याची कल्पना असताना टोकाचं पाऊल का उचललं?पोलिसांना अतिरिक्त मदत घटनास्थळी दाखल असताना पोलिसांनी आत जाण्याचं धाडस का केलं?, या प्रश्नांची उत्तर या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेल्या पोलिसांनाही गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान विचारली जाणार सूत्रांची माहिती आहे.
शिक्षण विभागातील अधिकार्यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता- (Powai Kidnapping Rohit Arya Marathi News)
पवई पोलिसांनी अमोल वाघमारे यांच्या तक्रारीनुसार पवई पोलिस ठाण्यात कलम १०९(१), १४०, २८७ बी एनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल वाघमारे यानेच रोहित आर्याने हल्ला केल्यानंतर त्याच्या प्रतिउत्तरात रोहित आर्यावर गोळी झाडली होती. आर्याने नुसत्या अल्पवयीन मुलांनाच नाही तर त्याच्यासोबत अन्य 3 व्यक्तींनाही ओलीस ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाख करत असून आर ए स्टुडिओच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचाही गुन्हे शाखेचे पोलीस जबाब नोंदवणारआहे. शिवाय आर्याने हे टोकाचं पाऊल का उचललं शिक्षण विभागाबाबत त्याने केलेले आरोप याची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शिक्षण विभागातील अधिकार्यांचाही जबाब नोंदवला जाऊ शकतो.



















