Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी, आतापर्यंत काय काय घडलं?, सर्व अपडेट्स
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार (Mumbai Morcha) आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा (Satyacha Morcha) काढणार आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असणार आहेत. आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत हा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : सगळं विसरून आम्हाला एक व्हाव लागेल - शरद पवार
लोकशीत संविधानेन जो अधिकार दिला आहे त्याच रक्षण करण्याची आज वेळ आली आहे
सगळं विसरून आम्हाला एक व्हाव लागेल
सिद्ध करून देण्याचं आम्हाला आव्हान केल होत ज्यांनी सिद्ध केल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला
गुन्हे दाखल होतात याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत
संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर एक व्हाव लागेल
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : शरद पवार यांचं मोर्चास्थळी भाषण सुरू
आज सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली...
























