Chandrapur Crime News : वृद्ध आई-वडिलांना घरात डांबून जन्मदात्या मुलाने केला प्राणघातक हल्ला; आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर
Chandrapur : किरकोळ वादातून एका मुलाने चक्क आपल्या वृद्ध आईवडिलांना घरात डांबून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेमध्ये आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी आहेत.
Chandrapur Crime News चंद्रपूर : शेतीच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादातून एका मुलाने चक्क आपल्या आईवडिलांना घरात डांबून त्यांच्यावर प्राणघातक (Crime News) हल्ला केला आहे. या घटनेमध्ये आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी आहेत. ही धक्कादायक घटना चंद्रपूरच्या (Chandrapur) कोरपना तालुक्यातील लोणी या गावात घडली. कमला सातपुते असे मृत वयोवृद्ध आईचे नाव आहे, तर पांडुरंग सातपुते असे गंभीर जखमी असलेल्या वृद्ध वडिलांचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मारेकरी मुलाला पोलिसांनी (Chandrapur Police)अटक केली असून मनोज पांडुरंग सातपुते (45) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र जन्मदात्या वृद्ध आई-वाडिलांवर अशा पद्धतीने मारहाण केल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
आईचा घटनास्थळीच मृत्यू, वडील गंभीर जखमी
कोरपना तालुक्यातील लोणी या गावातील रहिवासी असेलेल्या पांडुरंग आणि त्यांच्या पत्नी कमला सातपुते यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचे विवाह झाले असून, ते वेगवेगळे राहतात. सातपुते दाम्पत्याकडे 20 एकर जमीन आहे. या जमिनीच्या पैशांवरून मुलांमध्ये कायम वाद होत असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. याच जमिनीच्या पैशाच्या वादातून मागील काही दिवसांपासून सातपुते कुटुंबामध्ये वाद होता. बुधवार, 21 फेब्रुवारीला त्यांच्यातील हा वाद विकोपाला गेला. त्यातून रागाच्या भरात मुलगा मनोजने आई कमला आणि वडील पांडुरंग यांना घरातील एका खोलीत डांबून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. या घटनेमध्ये आई कमला यांना जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील पांडुरंग सातपुते हे देखील गंभीर जखमी झाले. नंतर ही बाब मनोजच्या वहिनीच्या लक्षात येताच त्यांना जबर धक्क बसला. सासू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून त्यांनी आरडा-ओरड सुरू केली असता मनोजने त्यांच्या मागे धावून त्यांचावर देखील प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लपून बसल्याने त्यांचा जीव वाचला.
मारेकरी मुलाला अटक
घटनेनंतर मनोजने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान ही घटना शेजाऱ्यांना माहित होताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत पांडुरंग सातपुते यांना प्रथम कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान कोरपना पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला, तसेच पळून गेलेला मुलगा मनोजचा शोध सुरू केला. अल्पावधीतच मनोजचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनात कोरपना पोलीस करीत आहेत. मात्र या थरारक घटनेमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या