Buldhana Crime News : बुलढाण्यात चक्क अफूची शेती; तब्बल 12 कोटी 61 लाखांची अफूची झाडे जप्त, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे. यात जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय.

Buldhana Crime News : राज्यात अनेक ठिकाणी गांजाच्या तस्करी अथवा विक्रीवर कारवाई केली जात असताना बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र बुलढाण्यातच (Buldhana Crime News) नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहेत.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून अफूची शेती?
याप्रकरणी संतोष सानप या शेतकर्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलम आणि डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल जात आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिच्चून अफूची शेती होत असल्याने अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली असून परिसरत ही तपासणी करण्यात येत आहे.
इंदापूरात शेतकऱ्यांकडून अफूची शेती, तिघांविरोधात गुन्हा दाखल
इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात खसखसची म्हणजेच अफूची शेती करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने आपल्या शेतामध्ये ही लागवडीस बंदी असलेली खसखस म्हणजेच अफू लावलेली होती. गोपनीय बातमीदारांपतमार्फत याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर वालचंद नगर पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने संयुक्तिक ही कारवाई केली आहे. न्हावी गावाचे शिवारात मक्याच्या पिकात ही अफूची शेती केली होती.
पोलिसांनी कारवाई करत एकूण 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. रतन मारकड, बाळू जाधव आणि कल्याण जाधव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या तिघांविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम नुसार गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
हे ही वाचा
- Pune News: वडिलांचं 'ब्रेन डेड'! रूग्णालयात उपचारांवेळी पाहण्यासाठी आल्या अन्... पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरुन ठसे घेतले, पुण्यातील प्रकार
- Nashik News : नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

