जागेच्या वादातून बुलढाण्यात तुफान राडा, चार ते पाचजण गंभीर जखमी; स्वाभिमानच्या जिल्हाध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल
Buldhana Crime News : या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह 10 ते 12 लोकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Buldhana Crime News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव येथे जागेच्या जुन्या वादातुन दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने थेट एकमेकांना मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी थेट कोयत्याचा वापर करण्यात आला. ज्यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये एका शिक्षकाचा देखील समावेश आहे. तर, या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह 10 ते 12 लोकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील डोनगाव येथे जागेच्या जुन्या वादातुन दोन गटात तुफान राडा झाला. या घटनेत कोयत्याने मारहाण करण्यात आली असून, दोन्ही गटातील चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, याप्रकरणी डोनगाव पोलिसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे यांच्यासह पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
सात जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
स्वाभिमानी शेतकरी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सह इतर पदाधिकारी गजानन सातपुते यांच्या ताब्यात असलेल्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी बळजबरीने दुकानात घुसले असता हा राडा झाला. या घटनेत महिलांना सुद्धा मारहाण झालीय. याच घटनेत ज्ञानेश्वर टाले सुद्धा जखमी असून, त्यांनी सुद्धा पोलिसांत तक्रार दिलीय. यात जमखी गजानन सातपुते यांच्यासह सात जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या मारहाणीचे व्हिडिओ देखील समोर आले.
तुफान राडा....
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सह इतर पदाधिकारी गजानन सातपुते यांच्या ताब्यात असलेल्या दुकानात गेले होते. यावेळी सातपुते यांना दुकान खाली करण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी नकार देताच ज्ञानेश्वर टाले आणि त्यांच्या साथीदाराने बळजबरीने दुकान खाली करण्याचा प्रयत्न केला. यावरून वादाला सुरवात झाली. दरम्यान, दोन्ही बाजूने हाणामारी सुरु झाली. याचवेळी थेट कोयत्याने मारहाण करण्यात आल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटाचे लोकं समोर आल्याने तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी उपस्थित असलेल्या महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याने महिला देखील जखमी झाल्या आहेत. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाद थांबवत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
इतर महत्वाच्या बातम्या: