Pune Crime: आळंदीच्या शैक्षणिक संस्थेत धक्कादायक प्रकार, पाहुण्याकडून 12 वर्षांच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
पुण्यातील आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे.
Pune Crime: पाहूणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणाने आळंदीतील शैक्षणिक संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आळंदीसह संपूर्ण परिसर हादरलाय. (Sexual Assault) पुण्यातील आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
राज्यात महिला, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण सध्या एवढं वाढलंय की कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय. पुण्यातील आळदीत एका संस्थेत पाहूणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणानं वासनेची शिकार बनवत दोन 12 वर्षांच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानं परिसर हादरलाय. (Maharashtra Crime News)
अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार
शनिवारी मध्यरात्री आरोपी पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. आपल्या वासनेची शिकार बनवत 12 वर्षांच्या दोन मुलांवर त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. आळंदीत एका शैक्षणिक संस्थेत पाहूणा म्हणून आलेल्या या नराधमाच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली आहे.संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आळंदी पोलिसांनी आरोपी महेश याला अटक केली आहे. याप्रकरणी महेश मिसाळ मामा व त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला बकऱ्या चारण्याकरीता गेली असताना अत्याचार
महिलेला एकटी पाहून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नात 35 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. ही घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात घडली होती. दरम्यान, आज (दि.5) दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिकची माहिती अशी की, वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे शेत शिवारात 35 वर्षीय महिला बकऱ्या चारण्याकरीता जंगलात गेली होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने धार शस्त्राने मानेवर वार करून हत्या केल्याची घटना दोन दिवसा पूर्वी घडली होती...याप्रकरणी कारंजा पोलिसांनी तपासचक्र फिरवत गावातील रहीवासी संदिप गायकवाड हा व्यक्ती घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला.
हेही वाचा: