मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या
बेतियाच्या बैरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलाही टोला या गावात लग्नाच्या अवघ्या आठ दिवसांतच एका वधूने निर्घृणपणे पतीचा खून केला. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
![मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या Bihar: Newly Bride Killed Groom Within Few Days Of Marriage, Know How This Dreaded act took Place मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/21031439/Crime-Case.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेतिया : बेतियामधील बैरिया पोलिस स्टेशन परिसरातील मलाही टोला गावात लग्नाच्या आठ दिवसांच्या आतच नववधूने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. लग्नाच्या अवघ्या आठ दिवसानंतर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोहोचलेले पोलिसांचे पथक ताब्यात असलेल्या नवविवाहितेची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर मुलीने असे पाऊल का उचलले हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु अद्यापपर्यंत काहीही कळू शकले नाही. अद्याप पोलिसांना हत्येमध्ये वापरलेले हत्यार सापडलेले नाही, त्याबद्दल पोलिस आरोपी महिलेची चौकशी करत आहेत.
स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड्यातील मजूर श्याम जी साह यांचे आठ दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या रविवारी (13 डिसेंबर) धडाक्यात लग्न झाले होते. पूर्व चंपारणमधील गोविंदगंज पोलिस स्टेशन परिसरातील सरेया गावात श्यामचे लग्न झाले होते, त्यानंतर तो घरी पत्नीसह सुखात राहत होता. परंतु रविवारी पहाटेच श्यामची आई त्याला उठविण्यासाठी गेली असता श्याम रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
सासू खोलीत येताच मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलीला पकडून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून मुलीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. मात्र, लग्नाच्या अवघ्या आठ दिवसांत घडलेल्या या घटनेमागील कारण काय असू शकते? तसेच या हत्येमध्ये कोण सामील आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसही कसून तपास करत आहे.
संबंधित बातम्या : मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून लग्नाची मागणी घालून पोलिसाचा महिलेवर अत्याचार
सात लाखाची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला जेल नाही तर बढती! तक्रारदार म्हणतो..
पिंपरी चिंचवडमध्ये मावस बहिणींवर लैंगिक अत्याचार करून अपहरण, पाच आरोपींना बेड्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)