एक्स्प्लोर

Beed Crime: सरपंच संतोष देशमुखांना हालहाल करुन मारणाऱ्या जयराम चाटेच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, तुरुंगाबाहेर पडताच काय घडलं?

Santosh Deshmukh Murder Case Massajog: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारण्यात आले होते. जयदीप चाटे हा आरोपींपैकी एक आहे. काल तो तुरुंगाबाहेर आला होता.

Santosh Deshmukh Murder Case Massajog: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी जयराम चाटे याला शुक्रवारी एका दिवसासाठी तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले होते. जयराम चाटे (Jayram Chate) याच्या भावाचे 2 मार्चला निधन झाले होते. त्याच्या बाराव्याचा कार्यक्रम काल होता. त्यासाठी जयराम चाटे याच्या वकिलांनी  विनंती केल्यानंतर न्यायालयाने सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. जयराम चाटे याला काल तुरुंगातून बाहेर काढण्यात आले तेव्हा बंदुका घेतलेल्या पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याच्यासोबत होता. सात तासांच्या सवलतीनंतर भावाचे विधी आटोपून त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. (Maharashtra Crime news)

मस्साजोग गावचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांना विष्णू चाटे (Vishnu Chate), जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या सगळ्यांनी अक्षरश: हालहाल करुन मारले होते. लोखंडी रॉडच्या फटक्याने संतोष देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांना नग्न करून मारहाण केली आणि त्यानंतर गॅस पाईपचा वापर करून त्यांचे हात-पाय निकामी केले होते. हे सगळे सुरु असताना आरोपींनी वाल्मिक कराड (Walmik Karad News) याला व्हिडीओ कॉल केल्याचाही आरोप आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरुन गेले होते. मात्र, या सगळ्याचा आरोपी जयराम चाटे याला जराही पश्चाताप नसल्याचे दिसून आले.

जयराम चाटे काल तुरुंगाबाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आपण एका गंभीर हत्याप्रकरणातील आरोपी आहोत किंवा आपण माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे, याबद्दलच्या पश्चातापाचा कोणताही लवलेश नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा तणाव दिसून आला नाही. मात्र, त्याच्या लूकमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने पूर्णपणे क्लीन शेव्ह केली होती. त्याने काळ्या रंगाचा शर्ट, राखाडी जिन्स पँट परिधान केली होती. शर्टाचं पहिलं बटण त्याने लावले नव्हते. तसेच जयराम चाटे याने कपाळावर लाल गंध लावले होते. त्याच्या हातात एक रुमालही होता. तो शांतपणे पोलिसांसोबत चालत गाडीत बसला. भावाचे अंत्यविधी संपल्यावर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आले.

आणखी वाचा

जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; 25 प्रवासी जखमी, प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयवाह घटनाक्रम
समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; 25 प्रवासी जखमी, प्रत्यक्षदर्शीने सांगितला भयवाह घटनाक्रम
Shyam Manav : अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपास करण्याच्या सूचना; श्याम मानव यांचा आरोप
अशोक खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु, राष्ट्रवादी-शिवसेनेला धडा शिकवण्यासाठीच पोलिसांना तपास करण्याच्या सूचना; श्याम मानव यांचा आरोप
Yavatmal : मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणात पाणी काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
PM Modi and Nana Patole: मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
West Bengal Election 2026: महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
Embed widget