Bhiwandi Crime News: भिवंडीतील 17 वर्षीय शोहेब शेख हत्या प्रकरणातील दुसरा आरोपीस बेड्या; मौलाना निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक
Bhiwandi Crime News: अल्पवयीन मुला सोबत अनैतिक कृत्य आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुलाम रब्बानी शेख याला याआधीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात दुसरा मौलानाला अटक करण्यात आला आहे.

Bhiwandi Crime News: भिवंडी येथील नवी बस्तीमध्ये पाच वेळा अजान देणारा गुलाम रब्बानी शेख ऊर्फ बांग़ी याने एका अल्पवयीन मुला सोबत अनैतिक कृत्य केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घृणास्पद कृती शोएब शेख या अल्पवयीन मुलाने पाहिल्यानंतर त्याचा गळा दाबून खून (Crime News) करण्यात आला होता. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जमिनीत पुरण्यात आला होता. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुलाम रब्बानी शेख याला याआधीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात दुसरा मौलाना अटक करण्यात आला आहे. निशार रजा असे अटक आरोपीचे नाव आहे. याला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली आहे.
आधी गळा आवळून हत्या, मग मृतदेहाचे तुकडे करून दुकानातच केले दफन
पुढे आलेल्या माहितीनुसार, अजान देणारा बांगी मौलाना गुलाम रब्बानी शेख व नमाज पठण करून घेणारा मौलाना हे दोघेही नवी बस्ती नेहरूनगर परिसरात एकाच मज्जिदमध्ये कामाला होते. हे दोन्ही मौलाना बाबागिरी देखील करायचे. मात्र अजान देणाऱ्या बांगिला अल्पवयीन मुलावर अत्याचार करताना शोएब शेखने पाहिले होते. मात्र त्याचे हे दुष्कर्म उघड होऊ नये यासाठी त्यांनी शोएबला दुकानात बोलवून त्याची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून दुकानातच दफन केला होते.
त्यानंतर जेव्हा तो मज्जिदमध्ये आला तेव्हा त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग पाहून मज्जिदचे मौलाना निशार रजा यांनी त्याबाबत विचारले असता त्यांनी प्रथम खोटे सांगितले की हे चिकनचे रक्ताचे डाग आहेत. परंतु नाशिर रजा मौलानाने खरं बोलायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण हकीकत मौलानाला सांगितली. परंतु या हत्येचा गूढ या मज्जिदच्या दोन्ही मौलानाने लपवून ठेवला होता. मौलाना गुलाम रब्बानी शेख याची पूर्णपणे मदत मौलाना नाशिक रजा यांनी केली व हत्यानंतर देखील हे दोघे एकाच मज्जिदमध्ये काम करत होते.
न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, जेंव्हा पोलीस कोठडीतून मुख्य आरोपी गुलाम रब्बानी शेख पळून गेला होता. यानंतर मौलाना नासिर रजा यांनी ती मज्जिद सोडून भिवंडीच्या कोटरगेट येथील मज्जिदमध्ये मौलाना पदावर कार्यरत असल्याचे समोर आले. या हत्याचे मुख्य आरोपी मौलाना गुलाम रब्बानी शेख याला अटक झाल्यानंतर दुसरा आरोपी मौलाना नाशिक रजा फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. व पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.
हे ही वाचा
























