बीडमध्ये गुंडाचा फिल्मी थरार, चालत्या गाडीत पोलिसाचा गळा आवळला, जीप पलटी होऊन 5 पोलिस जखमी
Beed News Update : बीडमध्ये चालत्या गाडीत खूनातील गुन्हेगाराने पोलिसाचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात जीप पलटी होऊन 5 पोलिस जखमी झाले आहेत.
Beed News Update : बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुनातील आरोपीला ताब्यात घेऊन नेकनूर पोलिस ठाण्याकडे घेऊन येत असताना आरोपीने चालकाचा गळा दाबून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस गाडीचा अपघात होऊन पोलिस अधिकारी मुस्तफा शेख यांच्यासह अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खुनातील आरोपी असलेल्या रोहिदास निर्मळ याला पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही घटना घडली. सध्या जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुळुकवाडी येथील रोहिदास विठ्ठल निर्मळ याने दोन दिवसापूर्वीच आपल्या चुलता, चुलती आणि इतर दोघा जणांवर कोयत्याने वार करून हल्ला केला होता. यामध्ये त्याचे चुलते बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्याच खुनाच्या आरोपात रोहिदास याला नेकनूर पोलिसांनी अटक केली होती. आटक करून रोहिदासला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला पोलिस कोठडी सूनवण्याण्यात आली होती. त्यानंतर पोलिस त्याला घटनास्थळावर घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने चालू गाडीतच चालक पोलिस कर्मचाऱ्याचा गळा आवळला. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झालाय. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यामुळे गाडीतील पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि आरोपील देखील तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये नेकनूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख मुस्तफा, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख, पोलिस अमलदार सचिन मुरूमकर, बाबासाहेब खाडे आणि या प्रकरणात पंच म्हणून गेलेले ग्रामपंचायतचे कर्मचारी सय्यद फारेज व संदीप काळे हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात जखमी झालेला आरोपी निर्मळ याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, खूनातील आरोपीकडूनच पोलिसाचा गळा दाबळ्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटलेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक कसून तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या