'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना झाडलं, सुनावणीतील 10 मोठे मुद्दे
Badlapur School Crime News: लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का?, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.
Badlapur School Crime News मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर आज (22 ऑगस्ट) तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांना देखील झाडल्याचं समोर आलं आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात (Badlapur School Crime News) लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का?, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रिदवाक्य लक्षात घ्यावं. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' याचा अर्थ समजून घ्या, अशी समज देखील न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिली. हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, प्रश्न शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा आहे. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे, असे खडेबोलही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे.
बदलापूर प्रकरणी सुनावणीतील महत्वाचे मुद्दे:
-पीडीत मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का?
-बदलापूर पोलीसांनी केलं काय?
-इतक्या गंभीर प्रकरणात पोलीसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही...
-कारवाचे आदेश देताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही...
-बदलापूर पोलीसांनी यात काय केलं?, याचा अहवाल सादर करा
-बदलापूर पोलीसांनी काय कारवाई केली हे आम्हाला पाहाचंय
-त्यांनी त्यांचं काम केलेलं नाही, हे सध्यातरी दिसतंय
-शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीरतेनं घ्या - हायकोर्ट
-पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब, राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश
-महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रिदवाक्य लक्षात घ्यावं
-'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' याचा अर्थ समजून घ्या
-महाराष्ट्रातून गायब होणा-या महिलांच्या मुद्यावर राज्य सरकारला नोटीस जारी
-गेल्या 5 वर्षात राज्यभरातून 1 लाखांहून अधिक महिला गायब
-शहाजी जगताप या माजी सैनिकाची हायकोर्टात याचिका
-राज्य महिला आयोगाला यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, योग्य त्या उपाययोजना सुचवण्याचे निर्देश जारी
-मंगळवारी (27 ऑगस्ट) रोजी सुनावणीआधी अहवाल सादर करा, न्यायालयाचे निर्देश
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट-
बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळू शकते आणि तपासाची संपूर्ण दिशाही बदलू शकते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांशी 'एबीपी माझा'ने फोनवरुन संपर्क साधला. यावेळी अक्षय शिंदे याच्या आईने अनेक महत्त्वाचे खुलासे केले. अक्षय हा शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा. बाकी त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं, असे अक्षयच्या आईने सांगितले. अक्षय शिंदे हा गतीमंद होता का, असा प्रश्नही त्याच्या आईला विचारण्यात आला. यावर त्याची आई म्हणाली की, नाही, पण त्याला छातीचं दुखणं होतं. तो लहानपणापासून डोक्याने कमजोर आहे. त्याला काही औषधगोळ्या सुरु होत्या, अशी माहिती अक्षय शिंदे याच्या आईने दिली.
आणखी वाचा:
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची खरंच तीन लग्न झालीत का? वडिलांचा खळबळजनक दावा, म्हणाले...