1 ऑगस्टला शाळेत नेमणूक, 12-13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य, 20 तारखेला बदलापूरकर रस्त्यावर, आतापर्यंत काय काय घडलं?
Badlapur School Crime News: चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
Badlapur School Crime News: बदलापूरमधील एका नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच रेल्वे प्रवाशांनी आणि आंदोलन करणाऱ्यांनी देखील दगडफेक करून उत्तर दिले.
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार (Badlapur School Crime) करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, पोलिसांनी देखील आवाहन केलं, मात्र तरीदेखील नागरिक आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
आतापर्यंत काय-काय घडलं?
1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली..त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली.
गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे घडलेला प्रकार सांगितला
हा सगळा प्रकार 12 आणि 13 ऑगस्टला ती आणि तिच्या मैत्रिणीसोबत घडल्याचंही तिने सांगितलं.
त्यानंतर दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली.
त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरनेही त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं.
त्यानंतर दोन्ही पालकांनी स्थानिक मनसे नेत्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमातून शुक्रवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमाराला स्थानिक पोलिस स्टेशनमधे तक्रार दाखल करण्यासाठी गेले.
मात्र पालकांच्या आरोपानुसार जवळपास अर्धा तास त्यांना तत्कालिन पोलिस स्टेशन इनचार्ज शुभदा शितोळे यांनी पालकांची तक्रार नोंदवून घेण्या ऐवजी त्यांना काही तास बसवून ठेवलं आणि सगळ्या घटना तपासत असल्याचं सांगितलं.
पोलिसांच्या तपासात शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचंही लक्षात आलं
दरम्यान जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर शासकीय रूग्णालयात मुलींची मेडिकल तपासणी केली.
या सगळ्या प्रकारानंतर काहीच वेळात आरोपीला अटक झाली.
बदलापूर घटनेतील आजची (20 ऑगस्ट 2024) टाईमलाईन-
सकाळी 6 वाजता शाळे समोर आंदोलन सुरु झालं.
सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरु केला.. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद
सकाळी- 11.10 वाजता मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रीया देताना संयम ठेवण्याचे आवाहान केलं
सकाळी 11.30 वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले
दुपारी 11.45 वाजता आंदोलकांकडून शाळेचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.
दुपारी 12 वाजता आंदोलकांनी शाळेत जाऊन तोडफोड केली.
दुपारी 12.15 वाजता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर तातडीची पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली..
दुपारी 12.40 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरु केली.
दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा रेल्वेट्रॅकवर आले.. पोलिसांकडून पुन्हा आंदोलकांना समजवाण्याचा प्रयत्न सुरु झाला.
दुपारी 1.10 वाजता शाळेबाहेर तणाव वाढला.. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दुपारी 1.20 वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
दुपारी 1.35 वाजता उद्धव ठाकरेंनी बदलापूरवर प्रतिक्रिया.
दुपारी 1.45 वाजता शाळेचे ट्रस्टींनी शाळेतील तोडफोडीची पाहणी केली..एबीपी माझाशी बातचित.
दुपारी 2.30 च्या सुमाराला गृहमंत्री देवेंद्र फडणविसांनी प्रतिक्रिया दिली..आणि त्यानंतर मंत्री गिरीश महाजन आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले.
दुपारी 2.45पासून बदलापूर स्टेशनवर पुन्हा आंदोलक आक्रमक झाले आणि लोहमार्ग पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे त्यांना विनंती करत होते.
नेमकी घटना काय?
1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं. घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
संबंधित बातमी:
चिमुरड्या मुलींवर शाळेत अत्याचार, बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, Photo's