एक्स्प्लोर

Badlapur Encounter: बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय

Badlapur Encounter: बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, असे उज्जल निकम यांनी म्हटले.

Badlapur Encounter: ठाणे : बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर (Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अक्षय यांच्या झडापट झाल्यानंतर अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ही गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर भाष्य करताना पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे बदलापूर अत्याचार (Badlapur) प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwa nIkam) यांनी प्रतिक्रिया देताना, याची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे. 

बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य होणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. तसेच, याप्रकरणाची न्यायालयाीन चौकशी होईल, त्यानंतर सर्वकाही समोर येईल असेही निकम यांनी सांगितले.

कोण आहे नराधम अक्षय शिंदे?

  • अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे
  • अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत 
  • अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई 
  • या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता 
  • एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला 
  • अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब 
  • अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या 
  • अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील
  •  मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात 

आरोपीनं दिली होती गुन्ह्याची कबुली  

विशेष तपास पथकाने (एसआयटी) बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.   शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह 20 पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा सहभाग असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते.प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आरोपीने या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत, तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते. डॉक्टरांसमोर आरोपीने दिलेली माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे अधिकान्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील 183 तरतुदीनुसार दोन्ही यालिकांचा जयाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी, सिनेस्टाईल थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget