एक्स्प्लोर

Amravati Accident News : पुणे, नागपूर पाठोपाठ अमरावतीत भरधाव कारने एका इसमाला चिरडलं; आरोपी मात्र अद्याप फरारच!

पुण्यातील हिट अँड रन कार अपघाताची घटना संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरात देखील अशीच एक घटना घडली होती. मात्र या घटनेला आज 22 दिवस उलटले असले तरी अद्यापही या कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही.

Amravati News अमरावतीपुण्यातील हिट अँड रन कार अपघाताची घटना (Porsche Car Accident) संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरात देखील अशीच एक घटना घडली होती. यात अमरावतीच्या (Amravati News) गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मे च्या दुपारी संमती कॉलनी परिसरात एका भरधाव कार चालकाने भर दिवसा एका इसमाला जोरदार धडक दिली. त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या या इसमाला तसेच सोडून कार चालकाने पळ काढला होता.

हा अपघात इतका भीषण होता की यात या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना होऊन आज 22 दिवस उलटले असले तरी अद्यापही या कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही. एकीकडे राज्यात पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे समाजमन हेलावून गेलं असताना अमरावतीच्या या घटनेचेही स्मरण अमरावतीकरांना होत आहे. परिणामी, यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.     

22 दिवसानंतरही आरोपी फरारच!

अमरावती शहरातील किशोर नगर येथील रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकी वाहनाने जात होते. दरम्यान, एका भरधाव इंडिका कारने त्यांना जोरदार धडक देत उडविले. त्यानंतर या कारमधील तरुण बाहेर आले आणि परत कारमध्ये बसून निघून गेले. यावेळी त्यांनी जखमी भीमसेन यांना रुग्णालयात दाखल करण्याची देखील तसदी न घेता घटनास्थळावरून निघून गेले. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांनी भीमसेन वाहने यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा 15 मे रोजी उपचारअंती मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. त्यानंतर या संपूर्ण घटनेची तक्रार गाडगे नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र 22 दिवसानंतरही पोलिसांनी अद्यापही या प्रकरणातील आरोपींना अटक केलेली नाही. यामुळे कुटुंबीयांमध्ये आणि शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. 

नागपुरातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तिघांना अटक

पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरामध्ये अशाच पद्धतीची घटना घडली आहे.  शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकात एका मद्यधुंद कारचालकाने बेदारकपणे वाहन चालवत तिघांना धडक देत जखमी केलंय. यात पायी जाणारी महिला, पुरुष आणि तीन महिन्याचा चिमुकल्याचाही समावेश आहे.

तर या अपघातात बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारात झेंडा चौकात ही घटना घडली होती. असे असताना या तपासात आता पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि गांजा देखील आढळून आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget