Nagpur Police : पुणे अपघातानंतर नागपूर पोलीस अॅक्शन मोडवर; बेकायदेशीर बार,रेस्टॉरंटसह रूफ टॉपवर कारवाईचा बडगा
Nagpur Police Action On Pub Bar : पुण्यातील कल्याणीनगर येथील मद्य प्राशन आणि अपघातात दोघांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी बियर बार, पब आणि नाईट क्लब बद्दल कडक पावले उचलली आहेत.
Nagpur Police Action On Pub Bar नागपूर : पुण्यातील (Porsche Car Accident) कल्याणीनगर येथील मद्य प्राशन आणि अपघातात दोघांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) बियर बार, पब आणि नाईट क्लब बद्दल कडक पावले उचलली आहे. शहरात बार, पब आणि नाईट क्लबमध्ये मद्यप्राशन करणारे, अरेरावी किंवा भांडण करत असतील, तसेच बाहेर निघून त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होणार असल्याची शक्यता वाटल्यास, बार आणि पबच्या व्यवस्थापनाने त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली आहे.
तसेच बार, पब आणि नाईट क्लबमध्ये पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या नियमांचा काटेकोरपणे पालन करावे, असे ही पोलीस आयुक्तांनी बजावले आहे. दरम्यान काही पब आणि बारमध्ये नियमांचा उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी आठ बार आणि तीन रूफ टॉप रेस्टॉरंटवर गेल्या काही दिवसात कारवाई केल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
नागपूर पोलीस अॅक्शन मोडवर
पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार भीषण अपघात प्रकरणानंतर नागपूर प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांनी नियमांची मायमल्ली करणाऱ्या 8 बार रेस्टॉरंट, 3 रूफ टॉपवर कारवाईचा बडगा उगारलाय. तसेच बार, पब आणि इतरत्र मद्य प्रशानकरून काही व्यक्तिकडून नियमांची पायमल्ली होणार असल्याची शक्यता वाटल्यास बार आणि पबच्या व्यवस्थापनाने त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील अपघातानंतर नागपूरातील राम झूला परिसरात झालेले अपघाताचे प्रकरणही आता नव्याने चर्चेत आले आहे.
नागपूरच्या रामझुला ओहरब्रिजवरील अपघात नव्यानं चर्चेत
नागपूरच्या रामझुला ओहरब्रिजवर एक श्रीमंत घरातील महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी गेला होता. या घटनेत काळ्या रंगाच्या मर्सडिज मध्ये असलेल्या महिलेने अंत्यत वेगात रॅश ड्राईव्ह करत दुचकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन (Rash Driving)अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी हे उच्चभ्रू परिवारातल्या असल्याने पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला होता.
दरम्यान, घटनेच्या वेळी दोन्ही महिला दारू पिऊन असल्याचा दावा देखील पीडित कुटुंबाचा होता. पोलिसांनी दोन्ही महिलांची वैद्यकीय तपासणीकडून रक्ताचे नमुने घेतले. मात्र संशयित आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत जामीन मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार भीषण अपघात प्रकरणानंतर नागपूरातील या प्रकरणाची देखील चर्चा सध्या नागपुरात चर्चेत आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या