News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

Frequently Asked Questions

  • कोरोना व्हायरस काय आहे?

    नोव्हेल कोरोना हा एक विषाणू (व्हायरस) आहे, जो सर्वात पहिल्यांदा चीन देशाच्या वुहान येथे आढळला. याला नोव्हेल म्हणण्यात येते कारण हा विषाणू पहिल्यांदाच आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराला 'कोविड 19' हे नाव दिले आहे.

  • कोरोना विषाणूचा स्रोत (मूळ) काय आहे?

    सध्यातरी या विषाणूच्या संसगार्चा खात्रीशीर स्त्रोत कळालेला नाही. कोरोना विषाणू ही विषाणूंचे एक मोठे कुटुंब आहे, काहींमुळे लोक आजारी पडतात आणि काही प्राण्यांमध्ये पसरतात. सुरुवातीला चीनच्या वुहान येथे पसरलेल्या या साथीमधील लोकांचा सागरी अन्न आणि प्राणी बाजाराशी संबंध आला होता, अशी नोंद आहे.

  • कोरोनाची लक्षणं काय?

    आतापर्यंत या आजाराचा रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि श्वासोछ्वास करण्यास होणारा त्रास, अशी आहेत.

  • कोरोना व्हायरस कसा पसरतो?

    हा एक नवा विषाणू असल्यामुळे नेमका कशा-कशामुळे प्रसार होतो हे स्पष्ट नाही. सुरुवातीला कदाचीत प्राण्यापासून पसरलेला हा विषाणू आता व्यक्ती संपकार्तून पसरताना दिसतो आहे. असा तर्क आहे की इतर साथीच्या आजाराप्रमाणे एखादी विषाणू प्रभावित व्यक्ती जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा याचा प्रसार होतो.

  • कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल?

    या विषाणूचा इलाज करण्यासाठी सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही. या विषाणूला शरिरात प्रवेश करू न देणे हा सर्वोत्तम उपचार आहे. तसेच वैयक्तीक स्वच्छतेचे पालन करा, सतत साबणाने हात धुण्याची सवय ठेवा, शिंकताना व खोकताना तोंड झाका, प्रवास करणे टाळा.

  • लॉकडाऊन म्हणजे काय?

    'लॉकडाऊन'मध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मज्जाव केला जातो. संभाव्य धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन 'लॉकडाऊन'चा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा निर्णय किती कालावधीसाठी ठेवायचा हे संबंधित स्थितीवर अवलंबून आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे.

  • सायलेंट कॅरिअर म्हणजे नेमकं काय?

    सायलेंट कॅरिअर असे लोक ज्यांना कोरोनाची लागण तर झाली पण त्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत किंवा बऱ्याच उशीरा दिसतात. चीनच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात अशा कोरोना कॅरिअरचा उल्लेख सायलेंट कॅरिअर असा केला गेलाय. सायलेंट कॅरिअर असणारे हेच लोक त्यांच्या आजूबाजूला कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. सामान्यत: कोरोनाची लक्षणे पाच दिवसात बघायला मिळतात. पण या लोकांमध्ये तीन आठवड्यानंतर लक्षणे दिसतात.