एक्स्प्लोर

Tanaji Sawant : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क, JN1 चाचण्या वाढविण्याचे तानाजी सावंतांचे निर्देश

Tanaji Sawant : ‘JN1’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा गुरुवार 22 डिसेंबर रोजी आढावा घेतला.

पुणे : राज्यात कोरोनाच्या (Covid 19) ‘JN1’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कोविडशी संबंधित सर्व नियमांचं योग्य रितीने पाल करण्याचे आवाहन देखील आरोग्य मंत्री तानाजी सांवत (Tanaji Sawant) यांनी केलंय. ‘JN1’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देशही तानाजी सावंत यांनी दिलेत. 

‘JN1’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा गुरुवार 22 डिसेंबर रोजी आढावा घेतला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

 यावेळी तानाजी सावंतांनी म्हटलं की, जिल्हास्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करावा. ‘JN1’ हा व्हेरियंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहावे. नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हास्तरापासून घेण्यात यावी. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी.

 हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलागीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत आहेत की नाही याची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत. प्रत्येक जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असून चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अशी सूचना देखील तानाजी सावंतांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. 

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांसह जिल्हा रुग्णालय, आपला दवाखाना येथे फलक लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये यासाठी माध्यमांना माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यामार्फतच याविषयीची अधिकृत माहिती देण्यात यावी. जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती प्रसारित होणार नाही. प्रसार माध्यमांनीही याविषयीचे वृत्त देताना वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरेल अशी चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे . एक आठवड्यात  मूल्यमापन करून टास्क फोर्स बाबत निर्णय घेण्यात येईल असही तानाजी सावंतांनी म्हटलं. 

हेही वाचा : 

Marathwada Drought : निकषात बसत नसतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न? 'त्या' दोन जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याची नोंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Raid on I-PAC: बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
बंगालमध्ये निवडणूक तोंडावर येताच ईडी कामाला लागली; थेट तृणमूल काँग्रेसची स्ट्रॅटेजी बनवणाऱ्या फर्मवर धाड, स्वत: ममता दीदी पोहोचल्या
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
मोठी बातमी! नव्याने निवडून आलेल्या 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात, काँग्रेसला 'दे धक्का'
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Embed widget