Ryo Tatsuki Predictions : 2025 साल हे जगाच्या विनाशाची सुरुवात, कोरोना महामारी परत येणार, जपानमध्ये त्सुनामी येणार; महिलेची बाबा वेंगापेक्षाही भयंकर भविष्यवाणी
Japan Baba Vanga Ryo Tatsuki Predictions : रिओ तात्सुकी या जपानच्या भविष्यवेत्या महिलेने या आधीही केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

Japan Baba Vanga Ryo Tatsuki Predictions : बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी 2025 या वर्षाबद्दल अनेक भीतीदायक भाकिते केली आहेत. बाबा वेंगा यांचे भाकीत खरे ठरले तर जगभर अराजक माजेल. बाबा वंगा यांचे सर्वात धोकादायक भाकीत असे आहे की जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल. त्याची सुरुवात युरोपमधील मोठ्या संघर्षाने होईल आणि मोठी लोकसंख्या नष्ट होईल. मात्र, एका जपानी महिलेने बाबा वेंगापेक्षाही धोकादायक भविष्यवाणी केली आहे.
विशेष म्हणजे या महिलेचे आतापर्यंतचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. अशा परिस्थितीत तिने केलेली इतर भाकितेही खरी ठरली तर जग सर्वनाशाच्या उंबरठ्यावर येईल. ही महिला दुसरी कोणी नसून जपानची रिओ तात्सुकी (Ryo Tatsuki) आहे. तिला जपानचे बाबा वेंगा म्हणूनही ओळखले जाते.
राजकुमारी डायनाच्या मृत्यूची भविष्यवाणी
जपानी भविष्यवेत्या रिओ तात्सुकी यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. असे म्हणतात की ती तिच्या स्वप्नात जे पाहते ते खरे ठरते. तात्सुकीने राजकुमारी डायना, गायक फ्रेडी मर्क्युरी यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. ती तंतोतंत खरी ठरली.
एवढेच नाही तर रिओ तात्सुकी हिने 1999 मध्ये एका पुस्तकात कोरोना महामारीबद्दल भाकीतही केले होते. तात्सुकीने तिच्या 'द फ्यूचर ॲज आय सी इट' या पुस्तकात जगभरात साथीच्या रोगाचा प्रसार होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. एप्रिलमध्ये महामारी शिगेला पोहोचेल असे म्हटले होते. 2020 नंतर जेव्हा कोरोनाची दुसरी लाट परत आली, तेव्हा एप्रिलपासून मृत्यूची सर्वाधिक संख्या समोर येऊ लागली.
साथीचा रोग आणि त्सुनामी परत येण्याचा अंदाज
रिओ तात्सुकी हिने तिच्या पुस्तकात पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या (Coronavirus) पुनरागमनाबद्दल लिहिले आहे. 2030 मध्ये ही महामारी पुन्हा एकदा परत येईल असा अंदाज तिने वर्तवला आहे. 2020 नंतर ही महामारी नाहीशी होईल आणि 2030 मध्ये पुन्हा परत येईल. अशा परिस्थितीत जगात भयंकर विध्वंस होण्याची शक्यता आहे. याशिवाय तात्सुकीने जुलैमध्येच जपानमध्ये सुनामी (Japan Tsunami) येण्याची शक्यता वर्तवली आहे. या त्सुनामीने मोठ्या प्रमाणात विध्वंस होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
ही बातमी वाचा:























