एक्स्प्लोर

AstraZeneca COVID 19 Vaccine: कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा, ॲस्ट्राझेन्का कंपनीकडून महत्त्वाची घोषणा

COVID 19 Vaccine: ॲस्ट्राझेन्का कंपनीने भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या साथीने लशीची निर्मिती केली होती. कोरोनाच्या काळात भारतात सर्वप्रथमी ही लस उपलब्ध झाली होती. त्यामुळे बहुतांश लोकांनी ही लस घेतली होती.

मुंबई: कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी धास्ती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या ॲस्ट्राझेन्का (AstraZeneca) या कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ( Important decision after Covishield Vaccine Side Effectes on Health)

ॲस्ट्राझेन्काने जगभरातून कोव्हिशिल्ड लशीचा साठा परत मागवून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी कंपनीने याबाबतची घोषणा करत जगभरातून कोव्हिशिल्ड लस मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. लशीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. परंतु, मुळात आता जागतिक स्तरावर या लशीची मागणी अत्यंत कमी असल्याने ॲस्ट्राझेन्काने लस परत मागवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. कोरोना साथीच्या (Coronavirus) काळात कोव्हिशिल्ड ही जगात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या प्रतिबंधक लशींपैकी एक होती. मात्र,आता बाजारपेठेत कोरोनासाठीच्या (Covid 19) आणखी प्रगत लशी उपलब्ध आहेत. साहजिकच त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे ॲस्ट्राझेन्का कंपनीने कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती आणि वितरण थांबवले आहे.

Covid Vaccine : कोविशिल्ड वॅक्सिन घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठी होण्याची धोका, एस्ट्राजझेनेका कंपनीची कबूली

कोव्हिशिल्ड लशीमुळे कोणते दुष्परिणाम?

गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम भोगलेल्या अनेकजणांची उदाहरणे समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये यावरुन न्यायालयात वाद सुरु आहे. या प्रकरणात न्यायालयात कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम झालेल्या रुग्णांची यादी सादर करण्यात आली. त्यापैकी अनेक रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची बाब समोर आली होती. ॲस्ट्राझेन्का कंपनीनेही कोविशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकतो, त्यामुळे रक्तात गुठळ्या तयार होऊ शकतात, याची कबुली न्यायालयात  दिली होती. मात्र, लाखांमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसू शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि कोरोना काळात परिस्थिती हाताळलेल्या आयसीएमआरच्या माजी शास्त्रज्ञांनी कोव्हिशिल्ड लशीपासून भारतीयांना कमी धोका असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा

तुम्हीही कोविशिल्ड लस घेतलीय? ह्रदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकचा कितपत धोका? जाणून घ्या सविस्तर...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Embed widget