एक्स्प्लोर

COVID 19 in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक 36 रुग्ण सापडले, सक्रिय रुग्णसंख्या चारशेजवळ 

Maharashtra Covid 19 Cases : बुधवारी मुंबईत 36, ठाण्यात 24 तर पुण्यात 9 नव्या रुग्णांची भर पडली आहे. असं असलं तरी कोरोनाचा नवा विषाणू धोकादायक नाही, घाबरून जाऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे. 

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 383 वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यात कोरोनामुळे कुणाचाही मृ्त्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

घाबरुन न जाण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

सध्या कोविड साठी महाराष्ट्रामध्ये ILI (Influenza like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविड साठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझिटिव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. 

Maharashtra Covid 19 Cases : राज्यातील कोरोनाची आकडेवारी 

  • जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या - 8868
  • जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण - 521
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 132
  • बुधवारी सापडलेले रुग्ण - 86 (मुंबई-36, पुणे मनपा-9, पिंपरी चिंचवड मनपा-3, ठाणे मनपा-24, कल्याण मनपा -2, नवी मुंबई मनपा 4, पनवेल मनपा 4. नागपूर मनपा , अहिल्यानगर मनपा -2, रायगड -1).
  • सक्रिय रुग्णसंख्या - 383 
  • जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या - 352

सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 5 व इतर असे एकूण 6 रुग्ण दगावले. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सौझ्झर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तसेच तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक (Cerebrovascular Disease) झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोअॅसीडोसीस (DKA with LRTI) आजार होता. पाचव्या रुग्णास ILD (Interstitial Ling Disease) होता. सहावा रुग्ण 47 वर्षीय महिला असून, सदर महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.

Covid 19 Cases In India : देशात कोरोनाचे नवे चार व्हेरिएंट

देशभरात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट सापडले आहेत. त्यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 या व्हेरिएंटचा समावेश आहे. या नव्या व्हेरिएंट्सचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जात आहे. 

Covid 19 JN.1 Variant : काय आहे JN.1  व्हेरिएंट?

JN.1  व्हेरिएंट हा ओमिक्रॉन BA.2.86 या व्हेरिएंटचा एक स्ट्रेन आहे. त्याला पिरोला असंही म्हटलं जातं. ऑगस्ट 2023 मध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा समोर आला होता. डिसेंबर 2023 मध्ये WHO ने ते 'इंटरेस्ट व्हेरिएंट' म्हणून घोषित केले. या व्हेरिएंटमध्ये जवळपास 30 म्युटेशन कार्यरत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, JN.1 इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो, परंतु तो फार गंभीर नाही. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Embed widget