YouTube क्रिएटर्समुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती, भारताच्या जीडीपीत दहा हजार कोटींचे योगदान
YouTube GDP Contribution: भारतातही युट्यूब वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यूट्यूबची लोकप्रियता वाढतच आहे. या माध्यमावर क्रिएटर म्हणून व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचीही संख्या वाढतच आहे.
YouTube Creators Annually Contributing In GDP: जगभरात अब्जावधी नेटकरी इतर माध्यमांप्रमाणे यूट्यूबचा वापर करतात. यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन व्हिडीओंची मेजवानी नेटकऱ्यांना मिळते. तसेच अनेकजण आपले व्हिडीओही यावर प्रसिद्ध करत असतात. याच कारणामुळे यूट्यूब वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही युट्यूब वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यूट्यूबची लोकप्रियता वाढतच आहे. या माध्यमावर क्रिएटर म्हणून व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात यूट्यूब क्रिएटरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे यूट्यूब क्रिएटर व्हिडीओतून लाखो रुपयांची कमाई करतात.. याच यूट्यूब क्रिएटरचं भारताच्या अर्थव्यवस्थेत दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचं योगदान आहे. 2021 मध्ये भारतात 750,000 पेक्षा जास्त नोकऱ्या यूट्यूबने दिले आहे. गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मार्च 2022 मध्ये युट्यूबने (Youtube) भारतीय अर्थव्यवस्थेत 6800 कोटी रुपयांचे योगदान दिले होतं.
सोशल मीडियामुळे अनेकांना स्टार बनवलं. गाव-खेड्यातील मुलांच्या कलांना या सोशल मीडियाने व्यासपीठ दिलं. गुगलच्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube मुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. व्हिडिओ शेअर केल्यानंतर मिळालेल्या कमाई व्यतिरिक्त, अनेकांना जागतिक चाहतावर्ग मिळविण्यात मदत होते. याच्या माध्यमातून ब्रँड भागीदारी, लाइव्ह परफॉर्मन्स आणि इतर मार्गांद्वारे कमाई करणं शक्य झाले आहे. हा महसूल (revenue) केवळ उद्योजकांसाठी नोकऱ्या आणि उत्पन्न निर्माण करत नाहीत, तर इतरांना प्रोत्साहन देणारे देखील ठरतात. या कमाईचा देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. युट्यूब क्रिएटरमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल दहा हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.
कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे भल्याभल्यांच्या रोजगारावर गदा आली. व्यावसाय मंदावले, रोजगार बुडाले, उपासमारी वाढली. या काळात सोशल मीडिया वापरणाऱ्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं. अनेकांना यूट्यूबमुळे रोजगार मिळाला. अनेकजण मालामाल झाले. या काळात सोशल मीडिया वापरणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. सरकारने गेल्या वर्षी सोशल मीडियावर शेअर केलेल्या अंदाजानुसार, देशात 448 दशलक्ष YouTube वापरकर्ते, 53 दशलक्ष व्हॉट्सअॅप वापरकर्ते, 41 दशलक्ष फेसबुक वापरकर्ते, 210 दशलक्ष इन्स्टाग्राम आणि 17.5 दशलक्ष ट्विटरवर आहेत.
ही बातमी वाचाच:
YOUTUBE ने अनेकांना केलं मालामाल! भारतीय अर्थव्यवस्थेत 6,800 कोटी रुपयांचे योगदान
'Sorry दादा'! भर चौकात बॅनर लावून शिवसेनेच्या नगरसेवकाचा माफीनामा, माजी आमदारांची मागितली जाहीर माफी