Best CNG Cars : इंधन दरवाढीच्या काळात परवडणाऱ्या सीएनजी कार; पाहा टॉप 5 सीएनजी कार
सीएनजी कार इलेक्ट्रिक कारपेक्षा स्वस्त आहेत आणि त्यांना चालवणे पेट्रोल डिझेल कार चालवण्यापेक्षा खूप कमी खर्चिक आहे. तसेच या कारमुळे प्रदूषण देखील फार कमी होते.
Best CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त झालेले सर्वच यासाठी पर्याय म्हणून इतर कारना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारच्या मागणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. तुलनेने इलेक्ट्रिक कार थोड्या महाग आहेत. अशा परिस्थितीत, सर्वोत्तम पर्याय म्हणजे सीएनजी कार. सीएनजी कार इलेक्ट्रिक कारपेक्षा स्वस्त आहेत आणि त्यांना चालवणे पेट्रोल डिझेल कार चालवण्यापेक्षा खूप कमी खर्चिक आहे. तसेच या कारमधूनही प्रदूषण फार कमी होते. त्यामुळेच टॉप 5 सीएनजी कार कोणत्या आहेत या बद्दल आज माहिती घेऊयात.
मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)
मारुती सुझुकी वॅगनआर दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. ही कार सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सीएनजी वॅगनआर 1.0-लीटर 3-सिलेंडर इंजिनमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 57 PS ची पॉवर आणि 78 Nm चा टॉर्क जनरेट करते. सीएनजी कार 32.52 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट एलएक्सआय आणि एलएक्सआय (ओ) ट्रिममध्ये उपलब्ध आहे ज्याच्या किंमती 5,70,500 रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro)
न्यू जनरेशन सॅन्ट्रो मॅग्ना आणि स्पोर्ट्स ट्रिममध्ये सीएनजी पर्यायासह उपलब्ध आहे. सॅन्ट्रोला 1.2-लीटर 4-सिलिंडर इंजिन मिळते. नवीन सँट्रोचे सीएनजी व्हेरिएंट 60 पीएस पॉवर आणि 85 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी मॉडेल 30.48 किमी/किलोचे मायलेज देते. या कारची सुरुवातीची किंमत 5,99,900 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)
मारुती सुझुकीकडे अनेक सीएनजी कार आहेत. अल्टो हे त्याचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. अल्टो ही एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. अल्टोला 0.8-लिटर इंजिन मिळते. सीएनजीवर चालणारी अल्टो 40 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरिएंट 31.59 किमी/किलोचे मायलेज देते. अल्टो हॅचबॅक सीएनजी व्हेरिएंट एलएक्सआय आणि एलएक्सआय (ओ) ट्रिममध्ये येते. या कारची किंमत 4,66,400 लाखांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)
पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीमध्ये उपलब्ध आहे. या सीएनजी हॅचबॅक कारमध्ये 1.0-लिटर इंजिन आहे जे 57 पीएस पॉवर आणि 78 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी मॉडेल 30.47 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय (ओ) ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 5,95,000 रुपये आहे.