एक्स्प्लोर

Explained: डॉलरच्या तुलनेत रुपयाने का गाठला ऐतिहासिक निचांकी दर?

why rupee falling : डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. रुपयाने गाठलेला दर हा आतापर्यंतचा निचांकी दर होता. जाणून घ्या यामागील काही कारणे...

why rupee falling : डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. रुपयाने सोमवारी 77.41 पैसे हा दर गाठला. डॉलरच्या तुलनेत हा आतापर्यंतचा सर्वाधिक नीचांक आहे. रिझर्व्ह बँकेने 4 मे रोजी रेपो दरात वाढ केली होती. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. त्यानंतर शेअर बाजारात आणि रुपयांमध्ये घसरण सुरू झाली. 

आशियाई बाजारातील चलनधोरण

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हनेदेखील व्याज दरात वाढ केली आहे. फेडरल रिझर्व्हशी सुसंगत व्याज दर ठेवण्यास जपान आणि चीनच्या बँकांना अपयश आल्याची परिस्थिती आहे. त्याचा फटका देशांना बसला. त्याशिवाय आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे चलनही वाईट कामगिरी करत आहेत. त्यांचा परिणामही रुपयावर होणे स्वाभाविक आहे. 

चीनच्या मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे चिनी चलनाचे अवमूल्यन होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत इतर आशियाई चलनदेखील सकारात्मक ट्रेंड दाखवू शकत नाही, असे एसएमसी ग्लोबलचे फॉरेक्स प्रमुख अर्णब बिश्वास यांनी म्हटले. 

मागील काही दिवसांमध्ये चिनी चलन युआन आणि जपानी चलन येन यांच्या मूल्यातही घसरण होत आहे. आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या चलनाची किंमत घसरत असल्याचा परिणाम रुपयांवर होत आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेप्रमाणेदेखील जपानची मध्यवर्ती बँकदेखील जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेशी जुळवून घेण्यास कमी पडत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.  

डॉलर आणखी मजबूत होण्याची शक्यता 

फॉरेक्स ट्रेडर्स आणि अर्थतज्ज्ञांनी म्हटले की, डॉलरची वाढती किंमत जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरणार आहे. फेडरल रिझर्व्हने उचललेल्या पावलांमुळे डॉलर मजबूत होत असला तरी जोखीमीच्या वातावरणामुळेदेखील त्याचा दर वधारत असल्याचे म्हटले जात आहे. युक्रेन-रशियात सुरू असलेले युद्ध आणि चीनमध्ये असलेला लॉकडाऊन याचे सावटही आंतरराष्ट्रीय बाजारावर आहे. त्याच्या परिणामी डॉलरची किंमत वाढत असल्याचे एचडीएफसी बँकेच्या अर्थतज्ज्ञ स्वाती अरोरा यांनी सांगितले. 

युरो चलनातही घसरण होण्याची शक्यता असून फेडरल रिझर्व्हकडून सुरू असलेल्या व्याज दर वाढीच्या निर्णयामुळे डॉलर आणखी मजबूत होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 

रिझर्व्ह बँकेचे अपयश?

भारताच्या परकिय गंगाजळीत घट होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर 2021 मध्ये 642.45 अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी असणाऱ्या भारताकडे सध्या 600 अब्ज डॉलरपेक्षाही कमी परकीय गंगाजळी राहिले आहे. 

तज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. रुपयाची किंमत घसरू लागल्यानंतर रिझर्व्ह बँकेने डॉलरची विक्री करून रुपयाची किंमत सावरण्याचा प्रयत्न केला. कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर रिझर्व्ह बँकेने डॉलरची विक्री केली होती अशी माहिती कोटक सिक्युरिटीचे फॉरेक्स संशोधन विभाग प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांनी दिली. 

आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे, डॉलरच्या तुलनेत इतर आशियाई समवयस्कांची घसरण होऊनही रुपया आतापर्यंत स्थिर राहण्यात यशस्वी झाला आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने रुपयावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. रिझर्व्ह बँकेने रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र, त्याने फार मोठा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध, युरोपीयन देशांनी रशियावर लादलेले निर्बंध, कच्च्या तेलाची वाढलेली मागणी यामुळेही कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणामही रुपयावर झाला आहे. 

शेअर बाजाराचा परिणाम 

रिझर्व्ह बँकेने परदेशी चलन बाजारात हस्तक्षेप केला असला तरी कायमस्वरुपी हस्तक्षेप करणे आव्हानात्मक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. व्यापार तूट वाढत असल्याने आणि परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातील शेअर्स विक्री केल्याने रुपयात घसरण सुरू आहे. 

ऑक्टोबर 2021 पासून भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांनी माघार घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. परदेशी गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री केली आहे. त्याचा परिणामही डॉलर आणि रुपयाच्या चलन विनिमयावर होत असल्याचे म्हटले जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Embed widget