आयटीआर नेमका कोणी भरला पाहिजे? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर..
सध्या आयटीआर भरण्यासाठी अनेकांची लगबग चालू आहे. करपात्र उत्पन्न गटात नसल्यामुळे अनेकांना आयटीआर भरणे अनिवार्य नाही, असे अनेकांना वाटते.
Income Tax Return: वित्त वर्ष 2023-24 आणि असेसमेंट इअर 2024-25 साठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. जी व्यक्ती करपात्र उत्पन्न गटात आहे, त्या व्यक्तीने आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. दुसरीकडे जे लोक टॅक्स स्लॅबच्या बाहेर आहेत, त्यांना आयटीआर भरण्याची आवश्यकता नाही. जुन्या कर वितरण प्रणालीनुसार ज्या लोकांचे उत्पन्म 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. तर नव्या करप्रणालीनुसार ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या व्यक्तीला कर देण्याची गरज नाही.
...पण आयटीआर भरणे गरजेचे
उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपये आहे त्यांना स्टँडर्ड 50,000 रुपयांच्या क्लेमनंतर प्राप्तिकर भरण्याची गरज नाही. मात्र अशा परिस्थितीत आयटीआर भरणे गरजेचे आहे. मात्र करपात्र उत्पन्न गटात नसल्यामुळे मला आयटीआर भरण्याची गरज नाही, असे अनेकांना वाटते पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आयटीआर भरणे गरजेचे असते.
आयटीआर कोणी भरणे गरजेचे आहे?
1. कोणतेही डिडक्शन न करता तुमचा एकूण पगार टॅक्स स्लॅममध्ये येत असेल तर तुम्ही आयटीआर भरणे गरजेचे आहे.
2. जुन्या करप्रणालीनुसार 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यांनी आयटीआर भरणे गरजेचे आहे.
3. 60 ते 80 वर्षे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असेल त्यांनी आयटीआर भरणे गरजेचे आहे.
4. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर संबंधित व्यक्तीने आयटीआर भरणे गरजेचे आहे.
5. ज्या करदात्यांकडे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट आहे, त्यांनीदेखील आयटीआर भरणे गरजेचे आहे.6. TCS/TDS 25,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्यांनी आयटीआर भरणे गरजेचे आहे.
8. विदेशातील संपत्तीच्या माध्यमातून तुम्ही काही कमाई करत असाल तर अशा स्थितीतही आयटीआर भरणे गरजेचे आहे.
9. परदेशात प्रवास करताना दोन लाखांपेक्षा अधिक खर्च केला तर तुम्हाला आयटीआर भरणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या मागणीला जोर, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?
पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अद्याप आले नाही? मग तक्रार कुठे करावी? जाणून घ्या A टू Z माहिती