एक्स्प्लोर
पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अद्याप आले नाही? मग तक्रार कुठे करावी? जाणून घ्या A टू Z माहिती
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेले आहेत. पण काही शेतकऱ्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.
pm kisan samman nidhi yojana (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मंगळवारी (18 जून) देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी ही आर्थिक मदत मंजूर केली होती.
2/8

पेरणीच्या काळात हा निधी बँक खात्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये याप्रमाणए केंद्र सरकारने मंगळवारी 9.6 कोटी शेतकऱ्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान, काही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेले नाहीत.
3/8

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला एकूण 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. एकूण तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना ही मदत मिळते.
4/8

राज्य तसेच देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना थेट तक्रार करता येते.
5/8

शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार रुपये मिळालेले नसतील तर ते थेट पीएम शेतकरी सन्मान निधीचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार करू शकतात.
6/8

या योजनेचे काम पाहणाऱ्या pmkisan-ict@gov.in. आणि pmkisan-funds@gov.in या अधिकृत मेल आयडींवर शेतकरी यासंबंधी तक्रार करू शकतात.
7/8

तसेच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे एक हेल्पलाईन नंबरही जारी केलेला आहे. शेतकरी 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवरही थेट तक्रार करू शकतात.
8/8

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक टोल फ्री नंबरही जारी करण्यात आला आहे. 1800-115-526 टोल फ्री नंबरवरही शेतकरी आपली तक्रार दाखल करू शकतात.
Published at : 19 Jun 2024 07:24 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
क्रिकेट























