एक्स्प्लोर

UPI : यूपीआय वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, बॅलन्स तपासणे, पेमेंट स्थिती तपासण्यावर मर्यादा,  1 ऑगस्टपासून नवे नियम लागू 

UPI New Rules : पैशांची देवाण घेवाण करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. 1 ऑगस्टपासून यूपीआयसंदर्भातील काही नियम बदलणार आहेत. 

UPI New Rules नवी दिल्ली: ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्ही जर फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या अॅपद्वारे यूपीआयचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑगस्टपासून नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून नवे नियम लागू केले जाणार आहेत. यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांबाबत काही गोष्टी बदलल्या जाणार आहेत. 

नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नव्या API  नियमांना बँक आणि पेमेंट सर्व्हिस प्रोवायडर्स साठी लागू करेल. याचा हेतू यूपीआय यंत्रणेला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याचा आहे. याशिवाय सर्व्हर डाऊन या सारख्या गोष्टींपासून बचाव करण्याचा प्रयत्न देखील असेल. 

1 ऑगस्टपासून कोणत्या गोष्टी बदलणार?

येत्या 1 ऑगस्टपासून यूपीआय अॅपवरुन एका दिवसात 50 वेळा खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येईल. यामुळं वारंवार होणारे API कॉल्स कमी होतील, यंत्रणेवर ताण येणार नाही.  याशिवाय मोबाईल नंबर किती बँक अकांऊटशी जोडलेला आहे ही माहिती एका दिवसात 25 वेळा तपासता येईल.

ऑटोपेसाठी वेळ निश्चित

नेटफ्लिक्स,एसआयपी या सारख्या ऑटो डेबिट पेमेंटस हे नॉन पीक टाईममध्ये होतील. सकाळी 10, दुपारी 1 ते 5 दरम्यान आणि रात्री 9.30 वाजल्यानंतर ऑटो डेबिट पेमेंटस होतील.

एखादं पेमेंट अडकलं असल्यास त्याची स्थिती 3 वेळा तपासली पाहिजे. स्थिती तपासण्यामध्ये किमान 90 सेंकदांचं अंतर असणं आवश्यक आहे.

NPCI चे सतर्कतेचे आदेश 

डिजिटल पेमेंट फ्रॉड आणि फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. अधिकृत आणि ओळखीच्या अॅप आणि वेबसाईटचा वापर करावा. कोणत्या अनोळखी व्यक्तीकडून पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करु नका, त्यावरुन अॅप डाऊनलोड करु नका. APK फाईल्स, एसएमएस किंवा सोशल मीडियावरुन आलेल्या लिंकवर क्लिक करु नका. पेमेंट करण्यापूर्वी ज्याला पैसे पाठवत आहात त्या व्यक्तीच्या नावाची खात्री करुन घ्या. यूपीआय पिन किंवा ओटीपी कोणासोबत शेअर करु नका. यूपीआय पिन, ओटीपी किंवा बँक डिटेल्स यासारख्या गोपनीय गोष्टी कोणाला सांगू शकत नाही. एसएमएस आणि अॅप नोटिफिकेशन चालू ठावे. प्रत्येक व्यवहाराची माहिती मिळेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Embed widget