UPI ATM : कार्डचे टेन्शन संपले, देशातील पहिले यूपीआय एटीएम आले, पाहा कसे काढायचे पैसे
UPI Using ATM : यूपीआय एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
UPI Using ATM : भारतामधील पहिले यूपीआय (UPI ATM) एटीएम लाँच करण्यात आले आहे. हिताची लिमिटेडची उपकंपनी असलेल्या हिताची पेमेंट सर्विसने UPI ATM लॉन्च केले आहे. यूपीआय एटीमच्या मदतीने कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रथमच यूपीआय एटीएम (UPI ATM) पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. भाजप नेत्यांनीही यूपीआय एटीएमचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
यूपीआय एटीएममुळे डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सूटका होणार असल्याचा दावा केला जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. UPI एटीएमला व्हाइट लेबल एटीएम (WLA) म्हणून आणले आहे. एटीएम यूजर्सला वेगवेगळ्या खात्यावरुन यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा दिली जातेय.
हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ -
UPI ATM: The future of fintech is here! 💪🇮🇳 pic.twitter.com/el9ioH3PNP
— Piyush Goyal (@PiyushGoyal) September 7, 2023
फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत -
यूपीआय एटीएम क्यूआर कोडद्वारे वापरता येणार आहे. या एटीएमसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज लागणार नाही. त्याशिवाय यूपीआय एटीएममुळे फसवणुकीचा धोकाही कमी होतो. कारण यूपीआय एटीएम वापरताना कोणताही कार्ड नंबर किंवा पिन नंबर टाकण्याची गरज नाही. यूपीआय एटीएमकडे कार्ड स्किमिंगसारख्या आर्थिक फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी एक सकारात्मक उपाय म्हणून पाहिले जाते. यूपीआय एटीएमची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
कसे काम करेल यूपीआय एटीएम -
मुंबई ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएमचा डेमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये यूपीआय एटीएमला टच पॅनल असल्याचे दिसतेय. यूपीआय कार्डलेस कॅश या पर्यायावर क्लिक केल्यास आणखी एक विंडे सुरु होतो. त्यामध्ये पैशांचे विविध पर्याय दिसता.. 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये आणि अन्य... असे पर्याय दिसतात.. तुम्हाला जितके पैसे काढायचे त्यावर क्लिक करा... त्यानंतर स्क्रिनवर क्यूआर कोड येईल.
आता त्यानंतर यूपीआय अॅपवरु क्यूआर कोड स्कॅन करा... त्यानंतर युजर्सला बँक खाते निवडावे लागेल. त्यानंतर UPI पिन टाका. तुम्ही निवडलेली रक्कम यूपीआय एटीएममधून बाहेर येईल.