एक्स्प्लोर

UIDAI Aadhar Update:  तुमच्या 'आधार'ला दुसऱ्यांचा मोबाईल क्रमांक लिंक नाही ना? अशी करा पडताळणी

UIDAI Aadhar Update:  नागरिकांना त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी जोडला आहे याबद्दल माहिती नसल्याने आधार ओटीपी दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती.

UIDAI Aadhar Update:  तुमच्या आधारसोबत कोणता मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी लिंक आहे, हे तुम्हाला आता सहजपणे पडताळता येणार आहे. UIDAI ने  (Unique Identification Authority of India) नागरिकांसाठी नवीन सुविधा लाँच केली आहे. यामध्ये नागरिकांना स्वत: आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करता येणार आहे. 

नागरिकांना  त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी जोडला आहे याबद्दल माहिती किंवा खात्री नव्हती. त्यामुळे आधार ओटीपी दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती. आता या सुविधेमुळे नागरिकांना अगदी सहजपणे हे तपासता येईल.

अशी करता येणार पडताळणी 

'आधार'च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://myaadhaar.uidai.gov.in/) किंवा mAadhaar ऍपद्वारे  ‘'व्हेरिफाय ईमेल /मोबाईल नंबर '  शीर्षकाखाली ही  सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांचा स्वतःचा ई-मेल, मोबाईल क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे की नाही हे पडताळता येणार आहे. 

UIDAI च्या या खास सुविधेमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना त्यांचाच मोबाईल क्रमांक, ई-मेल आधारशी लिंक आहे का, याची माहिती आहे. 

मोबाईल क्रमांक आठवत नाही? मग हा आहे पर्याय

जर नागरिकांना 'आधार'च्या नाव नोंदणी दरम्यान दिलेला मोबाईल क्रमांक आठवत नसेल, तर  Myadhaar पोर्टल किंवा mAadhaar ऍपवर  Verify Aadhaar शीर्षकावर मोबाईल क्रमांकाचे  शेवटचे तीन अंक तपासून पाहता येतील.

नागरिकाला आपल्या 'आधार'ला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी अपडेट करायचा असेल तर जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

घरबसल्या ऑनलाइन करा 'हे' अपडेट्स

आधार कार्डमध्ये अनेक गोष्टी ऑनलाइन अपडेट केल्या जाऊ शकतात. यामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता आणि लिंग इत्यादी माहिती तुम्हाला घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावर ऑनलाइन बदलता येते. त्याचबरोबर UDI ची विशेष सुविधाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्टल वेबसाइटवरून मोबाईल नंबर बदलू शकता.

'ही' कामं मात्र ऑफलाइन करावी लागतील

आधार कार्ड संबंधित काही अपडेट्स मात्र तुम्हाला ऑफलान केंद्रावर जाऊनच कराव्या लागतील. डेमोग्राफिक डेटा व्यतिरिक्त, बायोमेट्रिक डेटा, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्याचं काम तुम्हाला ऑफलाइनच करावं लागेल. यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावं लागेल. तुम्ही वेबसाइटद्वारे आधार सेवा केंद्रामध्ये जाण्यासाठी अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला डेमोग्राफिक डेटा अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असेल. बायोमेट्रिक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

'या' अपडेट करण्यासाठी शुल्क

जर तुम्ही आधार कार्डमधील मोबाईल नंबर, बायोमेट्रिक डेटा, फोटो यासारख्या गोष्टी अपडेट्स तर तुमच्याकडून 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget