Twitter Layoffs : एलॉन मस्क यांचा यु-टर्न, ट्विटरने कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं, काय आहे कारण?
Twitter Layoffs : मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावलं आहे.
Elon Musk Recalls Some Fired Employees : ट्विटरचे ( Twitter ) नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांना त्यांच्याचं एका निर्णयावरून यु-टर्न घेतला आहे. ट्विटरने ( Twitter Deal ) नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेताच कंपनीमध्ये काही मोठे बदल केले आहेत. त्या मोठ्या निर्णयांमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांनी कंपनीतून जवळपास निम्म्या लोकांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
ट्विटर कंपनीतून अनेकांना नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ट्विटर कंपनी पुन्हा कामावरून काढलेल्या लोकांना परत बोलावलं आहे. ट्विटर कंपनीकडून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली होती.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ज्या लोकांना परत बोलावले जात आहे त्यापैकी काहींना चुकून काढून टाकण्यात आले. आता कंपनीच्या लक्षात आलं की ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते, त्यांच्यापैकी अनेकांची एलॉन मस्कच्या नवीन धोरणासाठी आवश्यकता असेल. हे कर्मचारी आगामी काळात कंपनीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
कर्मचारी कपात प्रक्रियेत ट्विटरची घाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेद केल्यानंतर कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी या आठवड्यात सुमारे 3,700 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आलं. कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवत कंपनीने ही प्रक्रिया पूर्ण केली. पण आता यातील अनेक कर्मचार्यांना कंपनीत परत बोलावले जात असल्याने, कामावरून कमी करण्याची ही प्रक्रिया किती गोंधळलेली होती हे दिसून आलं आहे.
'याशिवाय दुसरा मार्ग नव्हता'
ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी जगभरातील ट्विटरच्या कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाचं समर्थन करत म्हटलं आहे की याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मस्क यांनी सांगितलं आहे की, कंपनीला दररोज लाखो डॉलर्सचे नुकसान होत असेल तर कंपनीकडे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मस्क यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ट्विटर कंपनीला दिवसाला चार दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे, त्यामुळे दुर्दैवाने कर्मचारी कपात करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.'
ट्विटरची सशुल्क सेवा सुरू
ट्विटरने एक नवीन Twitter Blue सबस्क्रिप्शन योजना लाँच केली आहे. या सेवेमध्ये युजरला व्हेरिफाईड ब्लू टीकसाठी शुल्क भरावं लागेल. यासाठी युजरला दरमहा आठ डॉलर शुल्क भरावे लागेल. कंपनीने असंही सांगितलं आहे की, येत्या काळात या सबस्क्रप्शनमध्ये आणखी फिचर वाढवण्यात येतील. यामध्ये कमी जाहिराती, मोठे व्हिडीओ पोस्ट करण्याची क्षमता या संबंधित फिचर्सचा समावेश आहे. सध्या पाच देशांमध्ये Twitter Blue सबस्क्रिप्शन सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे.
नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत भारतातही सुरु होईल सेवा
ट्विटरची पेड सर्व्हिस लवकरच भारतातही सुरू होणार आहे. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सर्व्हिस भारतात कधी सुरू होईल या प्रश्नावर उत्तर देताना मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मस्क ांनी सांगितलं आहे की, या म्हणजेच नोव्हेंबर महिनाअखेर पर्यंत भारतातही ट्विटरची पेड सर्व्हिस सुरु होण्याची शक्यता आहे.