Elon Musk : ट्वीटर ताब्यात घेणे एलन मस्कसाठी सोपं नाही; कंपनीकडून Poison Pill चे धोरण लागू
Elon Musk Twitter : एलन मस्क यांना ट्वीटर कंपनी खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने Poison Pill चे धोरण लागू केले आहे.
![Elon Musk : ट्वीटर ताब्यात घेणे एलन मस्कसाठी सोपं नाही; कंपनीकडून Poison Pill चे धोरण लागू Twitter Adopts Poison Pill policy To Fight and prevent Elon Musk Takeover Elon Musk : ट्वीटर ताब्यात घेणे एलन मस्कसाठी सोपं नाही; कंपनीकडून Poison Pill चे धोरण लागू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/14/18d2940c7f3c210fc6cc4ad2b7e95583_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Elon Musk Twitter : टेल्साचे या कंपनीचे प्रमुख आणि जगातील श्रीमंत व्यक्तीपैंकी एक असलेले एलन मस्क यांनी ट्वीटर कंपनी खरेदी करण्याची ऑफर देत मोठी खळबळ उडवली होती. मस्क यांना अटकाव करण्यासाठी आता ट्वीटरच्या संचालक मंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आता मस्क यांच्या ऑफरला अधिकृत उत्तर दिले आहे
ट्वीटरच्या संचालक मंडळाने मस्क यांच्याकडून कंपनी खरेदी करण्याच्या हालचाली रोखण्यासाठी रणनिती तयार केली आहे. ट्वीटरच्या संचालक मंडळाने Poison pill चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मस्क यांना कंपनी ताब्यात घेणे कठीण होऊ शकते.
Poison Pill म्हणजे काय?
Poison pill ही एक व्यावासायिक जगतातील एक संज्ञा आहे. एक प्रकारचे डावपेच म्हणून याकडे पाहिले जाते. कंपनी खरेदी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ट्वीटर संचालक मंडळाने Poison pill चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मस्क यांना कंपनी खरेदी करणे अशक्य होणार नसले तरी त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
Poison pill ही संज्ञा, आउटस्टँडिंग कॉमन स्टॉक्सचे 15 टक्के शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न एखादी व्यक्ती, संस्थेने केल्यास लागू होईल. सध्या मस्क यांच्याकडे 9 टक्के शेअर आहेत.
मस्क यांनी ट्वीटर कंपनी खरेदी करण्यासाठी कंपनीला 43 अब्ज डॉलरची ऑफर दिली होती. त्याआधी मस्क यांना संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ट्वीटर कंपनीची ही ऑफर मस्क यांनी नाकारली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Twitter Edit Button : एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर ट्विटरचं मिश्किल ट्वीट; म्हणालं, एडिट फिचरची चाचणी मागील एका वर्षापासून सुरु
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा गरीब देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका; संयुक्त राष्ट्राची माहिती
- जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार; 'हे' आहे कारण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)