IndiGo Fare Hike: अमेरिका- इराण युद्धामुळं इंडिगोकडून इंधन अधिभार, 425 ते 2300 रुपयांनी तिकिट दर वाढले, मध्यरात्रीपासून दर लागू
IndiGo Fare Hike: इंडिगोनं आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळं ATF च्या दरात वाढ झाल्यानं दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची झळ भारतीयांना देखील बसत आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोनं विमान प्रवासाच्या तिकिटात वाढ केली आहे. सध्या सुरु असलेल्या युद्धामुळं एविएशन टरबाइन फ्यूअल (ATF) 85 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळं मध्यरात्री पासून म्हणजेच 14 मार्च 2026 पासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी अधिक रक्कम मोजावी लागेल. इंडिगोकडून फ्यूअल चार्जेस आकारले जाणार आहेत. 14 मार्चचा दिवस सुरु होताच हे दर लागू होतील आणि नव्या बुकिंगवर लागू असतील. विमानाच्या तिकिटाच्या दरात 425 रुपयांपासून 2300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
इंडिगोकडून किती दरवाढ?
इंडिगोकडून 14 मार्चपासून भारतातील प्रवासासाठी 425 रुपये अधिक आकारले जातील. भारतीय उपखंडात म्हणजेच बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीवसाठी देखील 425 रुपये आकारले जातील. आखाती देशांमध्ये प्रवास करणार असल्यास 900 रुपये अधिक द्यावे लागतील. आग्नेय आशिया, आफ्रिका, पश्चिम आशियातील देशांसाठी 1800 रुपये तर यूरोपच्या प्रवाससाठी 2300 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.
इंडिगोनं काय म्हटलं?
IndiGo नं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळंATF च्या दरात मोठी वाढ झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. IATA च्या Jet Fuel Monitor नं देखील याला दुजोरा दिला आहे. इंडिगोनं म्हटलं की त्यांना ATF वर अधिक खर्च करावा लागत आहे. अचानक वाढलेल्या दरांमुळं संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होत आहे. इंडिगो अगोदर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसनं देखील विमान तिकिटांवर फ्यूअल सरचार्ज लागू करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीनं म्हटलं की, ' इंधनाच्या वाढत्या दरांचा भार प्रवास भाडे वाढवण्यासाठी टाकला असता तर तिकिटाचे दर वाढले असते. यासाठी प्रवाशांवर कमी भार पडावा म्हणून कमी प्रमाणात सरचार्ज लावण्यात आला आहे.
Fuel charge on bookings
— IndiGo (@IndiGo6E) March 13, 2026
Due to the sharp increase in fuel prices amid the evolving geopolitical situation in parts of the Middle East, IndiGo will implement a fuel charge on domestic and international routes for bookings made on or after 14 March 2026.
Please find the detailed… pic.twitter.com/Q0CGCPz59I
महत्त्वाच्या बातम्या





















