एक्स्प्लोर

Elon musk offers : एलन मस्क ट्वीटर खरेदी करणार? कंपनीला दिली 'ही' ऑफर आणि धमकी!

Elon musk offers : उद्योजक एलन मस्क यांनी ट्वीटर कंपनी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असल्याचे वृत्त आहे. मस्क यांनी 54.20 डॉलर या दराने प्रति शेअर खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

Elon musk offers :  टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले एलन मस्क हे ट्वीटर कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. मस्क यांनी 54.20 डॉलर प्रति शेअर या दराने कंपनीचे शेअर रोख रक्कमेत खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मस्क यांच्या या ऑफरच्या वृत्तानंतर ट्वीटरचे शेअर दर वधारले आहेत. 

मस्क यांनी ट्वीटरमध्ये 9 टक्के शेअर खरेदी केले असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता मस्क ट्वीटर कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. मस्क यांनी ट्वीटर कंपनीला दिलेल्या ऑफरची बातमी समोर येताच अमेरिकन शेअर मार्केटच्या प्री-ओपनींग सत्रात ट्वीटरच्या शेअर दरात 12 टक्क्यांनी वाढ झाली. 

ट्वीटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी लिहिलेल्या पत्रात मस्क यांनी म्हटले की, मी कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. सध्याच्या चौकटीत काम केल्यास कंपनीची भरभराट अशक्य आहे. त्यामुळे कंपनीमध्ये मोठे बदल होणे आवश्यक असल्याचे मस्क यांनी म्हटले. ट्वीटरमध्ये प्रचंड क्षमता असून त्याला वाव देण्याची आवश्यकता असल्याचे मस्क यांनी पत्रात म्हटले.

ट्वीटर कंपनीसाठी माझ्याकडून ही शेवटची आणि चांगली ऑफर आहे. कंपनीने या ऑफरवर गांभीर्याने विचार न केल्यास मी ट्वीटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबत फेरविचार करेल असा इशाराही मस्क यांनी पत्रातून दिला असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांना ट्वीटर कंपनीच्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय झाला होता. याची घोषणा ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी केली होती. मात्र, एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार दिला असल्याचे अग्रवाल यांनी काही तासांनी म्हटले. पराग यांनी सांगितलं की, संचालक मंडळात सामील असोत किंवा नसोत, आम्ही आमच्या शेअर होल्डर्सच्या सूचना आणि मतांना नेहमीच महत्त्व देतो. एलॉन हे ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनांसाठी तत्पर आहोत.

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget