मुलींची पहिली पसंती असलेला कपड्यांचा 'हा' मोठा ब्रँड आयपीओ आणण्याच्या तयारीत
Biba : मुलींची पहिली पसंती असलेला बिबा अॅपेरेल्सने आयपीओ आणण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे.
![मुलींची पहिली पसंती असलेला कपड्यांचा 'हा' मोठा ब्रँड आयपीओ आणण्याच्या तयारीत these the first choice brand of clothing for girls is all set to launch an IPO मुलींची पहिली पसंती असलेला कपड्यांचा 'हा' मोठा ब्रँड आयपीओ आणण्याच्या तयारीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/f7060cbe87c43ab0e261bae1373eba4b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Biba : मुलींची पहिली पसंती असलेला बिबा अॅपेरेल्सने आयपीओ आणण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. या कपड्याच्या ब्रँडला वारबर्ग पिंकस आणि फेअरिंग कॅपिटलच समर्थन आहे. कंपनीने आपला रेड हेरन्स प्रॉस्पेक्टस (RHP) बाजार नियामक सेबीकडे सादर केला आहे. मनीकंट्रोल या उद्योगविषयक घडामोडींचे अपडेट देणाऱ्या वेबसाईटने हे वृत्त विविध सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
बिबाने आपला ड्राफ्ट पेपर सादर करताना आयपीओच्या माध्यमातून सुमारे 1500 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर्सचा सेकंडरी इश्यू सुमारे 1400 कोटींचा आहे आणि उर्वरित लहान प्राथमिक घटक असतील.
याशिवाय, सूत्रांच्या म्हणण्यानुसार गुंतवणूक बँका JM Financial, HSBC Securities, DAM Capital, Equirus Capital आणि Ambit Capital आयपीओ वर काम करत आहेत. तथापि, त्वरित प्रतिक्रियेसाठी आम्ही बिबा किंवा गुंतवणूक बँकर्सशी संपर्क साधलेला नाही.
अनेक कंपन्यांनी आयपीओ मधून पैसे उभे केले
गेल्या काही महिन्यांत अनेक देशांतर्गत फॅशन लेबले (कंपन्या) ज्यांना खाजगी इक्विटी कंपन्यांचा पाठिंबा आहे, त्यांनी पैसा उभारण्यासाठी भांडवली बाजाराकडे वळले आहेत. गो कलर्सने आयपीओद्वारे 1014 कोटी रुपये उभे केले. गो-कलर्सला Sequoia Capital चे समर्थन होते. याशिवाय मान्यवर आणि वेदांत फॅशन यांनीही आयपीओद्वारे पैसे उभे केले आहेत. ज्यांना केदारा कॅपिटल्सचा पाठिंबा आहे. प्रेमच्या इन्व्हेस्ट आणि लाइटहाऊस फंडांचे समर्थन असलेल्या फॅबिंडियाने जानेवारीमध्ये आयपीओसाठीही कागदपत्रे दाखल केली.
सध्या, कपडे किंवा फॅशन जगतातील आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल आणि टीसीएनसी क्लोदिंग या कंपन्या लिस्टेड असून बाजारात या दोन्ही कंपन्यांची नावे मोठी आहेत.
संबंधित बातम्या
श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; 51 अब्ज डॉलरचे कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याची दिली कबुली
Share Market : शेअर बाजारातील घसरण सुरूच; Sensex 388 तर Nifty 144 अंकांनी घसरला
LIC Jeevan Labh Plan : 'या' योजनेमध्ये मिळेल 20 लाख रुपयांचा परतावा, एका पॉलिसीमध्ये नगण्य फायदे, वाचा सविस्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)