टाटा समुहाची वारी, देवाच्या दारी; वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईचा मोठा प्लॅन
Tata Group : टाटा समुह प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. सध्या टाटा समुहाची वारी आता देवाच्या दारी सुरु आहे.
Tata Group : टाटा समूह (Tata Group) हा देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहापैकी एक आहे. टाटा समुह प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. सध्या टाटा समुहाची वारी आता देवाच्या दारी सुरु आहे. म्हणजेच टाटा समूहाने वैष्णोदेवीसारख्या देशातील मोठ्या धार्मिक आणि अध्यात्मिक ठिकाणांपासून अयोध्या आणि तिरुपतीपर्यंत कमाईचा मोठा प्लॅन केला आहे. टाटा ग्रुपची नेमकी योजना काय आहे? पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
खरे तर 'इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड' या टाटा समूहाच्या कंपनीने आता आपले जाळे विविध ठिकाणी वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनीला या क्षेत्रात लीडर बनायचे आहे. त्यामुळं कंपनीने देशातील विविध धार्मिक स्थळांवर हॉटेल्स सुरू केली आहेत. तर काही ठिकाणी काम सुरू आहे. इंडियन हॉटेल्स ताज, विवांता आणि जिंजर या ब्रँड नावाने देशभरात हॉटेल व्यवसाय चालवतात.
वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत हॉटेल्स
टाटा ग्रुपची हॉटेल्स आता देशभरातील 50 हून अधिक धार्मिक स्थळांवर आहेत. येत्या काही वर्षांत त्यांची संख्या 66 पर्यंत वाढेल. कंपनीची हॉटेल्स वैष्णोदेवीपासून तिरुपती बालाजीपर्यंत सुरू झाली आहेत. कंपनी अयोध्येसारख्या नव्याने विकसित होणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्रातही आपला हॉटेल व्यवसाय विस्तारत आहे. कंपनीने अयोध्येसाठी 3 करार केले आहेत, त्यापैकी एक हॉटेल वर्षभरात कार्यान्वित होईल. त्यानंतर उर्वरित दोन सुरू होतील. इंडियन हॉटेल्स ही त्या कंपन्यांपैकी एक आहे जी गुवाहाटीसारख्या ठिकाणी पोहोचणारी पहिली हॉटेल ब्रँड होती. कंपनीने गुंतवणूक करून येथे हॉटेल सुरू केले. अध्यात्मिक ठिकाणी हॉटेल्स उघडणे हा देखील कंपनीच्या धोरणाचा एक भाग आहे.
आध्यात्मिक स्थळात व्यवसायाची महत्त्वाची भूमिका
जगभरात आध्यात्मिक स्थळे व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ आपल्यासाठीच नाही तर जगाच्या लोकसंख्येसाठीही त्याची खूप महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये टाटा ग्रुप आघाडीवर आहे. एवढेच नाही तर धार्मिक आणि अध्यात्मिक ठिकाणे पर्यटन आणि आदरातिथ्याच्या दृष्टीनेही एक सुरक्षित पर्याय आहे. कारण लोक चांगल्या किंवा वाईट काळात देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जातात. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळं त्याचा इतर व्यावसायिकांना मोठा फायदा होतो. दरम्यान, टाटा समुहानं देशातील विविध धार्मिक स्थळांवर हॉटेल्स सुरू केली आहेत. तर काही ठिकाणी काम सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! टाटांच्या नावावर नवीन विक्रम, 30 लाख कोटींचं मार्केट कॅप गाठणारा देशातील पहिला व्यवसाय