शिक्षण घेतलं पण नोकरी नाही, पतीच्या अपघातानंतर संघर्ष, महिलेनं शिमला मिरचीतून घेतलं लाखो रुपयाचं उत्पन्न
एका महिला शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या शेतीतून (capsicum cultivation) लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. कल्पना शर्मा (Kalpana Sharma) असं या महिलेचं नाव आहे.
Success Story of Women farmers : अलिकडच्या काळात सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला (Women) देखील काम करताना दिसत आहे. शेती क्षेत्रात देखील अनेक महिला मोठं उत्पादन घेताना दिसत आहेत. आज आपण अशाच एतका महिलेची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. या महिलेनं शिमला मिरचीच्या शेतीतून (capsicum cultivation) लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. कल्पना शर्मा (Kalpana Sharma) असं या हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील दोधवान या गावातील महिला शेतकऱ्याचं नाव आहे. पाहुयात या महिलेची यशोगाथा.
नोकरी मिळाली नाही, अखेर शेती करण्याचा निर्णय
महिला शेतकरी कल्पना शर्मा यांच्या पतीचा 2002 मध्ये गंभीर अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांनी संघर्षमय प्रवास सुरु केला आहे. घरात तीन मुलांचे संगोपन आणि पतीच्या उपचाराचा खर्च उचलणे तिच्यासाठी कठीण झाले होते. कल्पना यांच शिक्षण पदवीधर झाले होते. पण अनेक प्रयत्न करुनही त्यांना कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्यानंतर कल्पना यांनी काही कृषी अधिकाऱ्यांचा शेती तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर त्यांनी भाजीपाला पिकवण्यासाठी पॉलीहाऊस उभारण्याचा निर्णय घेतला त्यानुसंर तीन पॉलीहाऊस तयार केले. आज यातून त्या शिमला मिरचीसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहेत. यावेळी त्यांनी शिमला मिरचीच्या शेतीतून दोन लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
पतीच्या अपघातानंतर संघर्षमय जीवन सुरु
कल्पना शर्माने यांचे वय 45 वर्ष आहे. त्या मोठ्या जिद्दीनं शेती करत आहेत. 2002 मध्ये त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांचे संघर्षमय जीवन सुरु झाले. घरात तीन मुलांचे संगोपन आणि पतीच्या उपचाराचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. कल्पना पदवीधर असूनही त्यांनी नोकरी मिळाली नाही. त्यामुळं त्यांनी अखेर नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
यशस्वी महिला उद्योजक म्हणून ओळख
सुरुवातीला कल्पना यांनी भात, गहू, मका इत्यादी पारंपारिक पिके घेण्यास सुरुवात केली होती. परंतू त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. मग त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने भाजीपाल्याचे पिक घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे तीन पॉलीहाऊस आहेत. यामध्ये त्या विविध प्रकारच्या भाजीपाला लावतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. आज त्यांची यशस्वी महिला उद्योजक म्हणून ओळख झाली आहे.
भौगोलिकदृष्ट्या हिमाचल प्रदेश हे डोंगराळ राज्य
भौगोलिकदृष्ट्या हिमाचल प्रदेश हे डोंगराळ राज्य आहे. येथील जमीन असमान आहे. तसेच सरासरी वार्षिक पर्जन्यमान कमी आहे. शेतीचे मागासलेपण आणि कमी उत्पादकता हे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संरक्षित शेतीचा अवलंब करुन या समस्या सोडवून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवत आहेत.
2014 मध्ये कल्पना शर्मा कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात
2014 मध्ये कल्पना शर्मा कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आल्या होत्या. याआधी त्या फक्त मका, धान आणि गहू पिकवायची. केव्हीके, मंडी यांनी त्यांना संवर्धन शेतीचा अवलंब करण्यासाठी सल्ला दिला. विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे कौशल्ये देखील प्रदान केली. फेब्रुवारी 2015 मध्ये, महिला शेतकऱ्याने हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठ, पालमपूर आणि कृषी विज्ञान केंद्र येथे हंगामी भाजीपाला उत्पादन आणि संरक्षित शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कृषी विभागाच्या आर्थिक सहाय्याने 250 चौरस मीटरचे पॉलीहाऊस बांधले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज त्या भाजीपाला पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या: