हम किसीसे कम नही! काळ्या मातीत पिकवलं 'पिवळं सोनं', वर्षभरात लाखोंचा नफा, वाचा जिद्दी महिलेची यशोगाथा
आज आपण एका महिलेची यशोगाथा (success story) पाहणार आहेत. ज्या महिलेनं हळदीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. कांचन वर्मा असं मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नर्मदापुरम येथील महिला शेतकऱ्याचं नाव आहे.
Success Story : अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात (Agriculture Sector) सातत्यानं नव नवीन प्रयोग होत आहेत. पारंपारिक शेतीला बगल देत अनेकज आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. यातून भरघोस उत्पन्न काढत आहेत. आज पुरुषांच्या बरोबरीनेच महिला देखील शेतीत काम करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा (success story) पाहणार आहेत. ज्या महिलेनं हळदीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. कांचन वर्मा असं मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नर्मदापुरम येथील या महिला शेतकऱ्याचं नाव आहे. या महिला शेतकऱ्याने हळद शेतीतून (turmeric farming) लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवलं आहे.
नर्मदा नदीच्या काठावर कांचन वर्मा यांची जमीन आहे. ही जमीन हळद लागवडीसाठी योग्य मानली जाते. कांचन वर्मा यांनी 2020 मध्ये हळदीची लागवड केली होती. सुरुवातील हळदीची लागवड करताना कांचन वर्मा यांनी कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली. तसेच जमिनीची चांगली मशागत केली. तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळं कांचन वर्मा यांना हळद शेतीतून चांगलं उत्पन्न मिळालं आहे.
सेंद्रीय पद्धतीनं हळदीचे उत्पादन घेतलं
दरम्यान, कांचन वर्मा यांनी सेंद्रीय पद्धतीनं हळदीचे उत्पादन घेतलं आहे. त्यामुळं मातीकची सुपीकता वाढली आहे. यामुळं पीक देखील चांगलं बहरलं आहे. तसेच किटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेण आणि जीवामृतचा वापर केल्याची माहिती कांचन वर्मा यांनी दिली आहे. कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या बळावर कांचन यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
सध्या 10 एकर क्षेत्रावर हळदीची लागवड
दरम्यान, हळदीचा दर्जा वाढवण्यासाठी कांचन वर्मा यांनी काढणी झाल्यानंतर लगेच हळद धवून उकळून घेतली. त्यामुळं त्यांच्या हळदीला चांगला दर मिळाल्याची माहिती कांचन वर्मा यांनी दिली. हळद चांगल्या प्रतिची असल्यामुळं ग्राहक हळदीकडे आकर्षित झाला. त्यामुळं कांचन वर्मा यांनी हळदीच्या विक्रीतून चांगला नफा झाला. सध्या त्यांनी 10 एकर क्षेत्रावर हळद लावली आहे. यातून त्यांनी जवळपास 30 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. दरम्यान, ही शेती करताना कांचन वर्मा यांनी अनेक यशस्वी शेतकऱ्यांचं मार्गदर्शनं घेतलं होतं.
अलिकडच्या काळात अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतीनं शेतकी करत आहेत. यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: